मनमोहन सिंग यांचे निधन: देशाला चटका लावणारी बातमी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचे निधन!

मुंबई तक

Former Prime Minister Manmohan Singh passed away: माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे आज (26 डिसेंबर) राजधानी दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झालं. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे.

ADVERTISEMENT

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधन!
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधन!
social share
google news

बातम्या हायलाइट

point

माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचं निधन

point

वयाच्या 92 व्या वर्षी मनमोहन सिंह यांनी घेतला अखेरचा श्वास

point

प्रकृती अस्वास्थ्यामुळे डॉ. सिंह यांना एम्समध्ये करण्यात आलं होतं दाखल

नवी दिल्ली: माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचे आज (26 डिसेंबर) दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले. काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. आज संध्याकाळी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सलग दोन वेळा देशाचे पंतप्रधान राहिलेले माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांना अनेक दिवसांपासून आरोग्यविषयक समस्यांचा सामना करावा लागत होता. याआधीही प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना अनेकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. (former prime minister manmohan singh passes away at the age of 92 at aiims delhi)

मनमोहन सिंह यांना आज एम्स (ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स) च्या आपत्कालीन विभागात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात आणण्यात आले होते. त्यांच्यावर उपचारही सुरू होते. मात्र, काही वेळापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचा परिचय

डॉ. मनमोहन सिंह यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी अविभक्त भारतातील पंजाब प्रांतातील एका गावात झाला होता. सामान्य पार्श्वभूमीतून आलेल्या डॉ. सिंह यांनी त्यांच्या आयुष्यात शिक्षण, अर्थशास्त्र आणि राजकारणात विलक्षण कामगिरी केली. डॉ. मनमोहन सिंह यांनी 1948 मध्ये पंजाब विद्यापीठातून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली. यानंतर त्यांनी 1957 मध्ये केंब्रिज विद्यापीठातून (यूके) अर्थशास्त्रात प्रथम श्रेणी ऑनर्स पदवी प्राप्त केली. त्यांनी 1962 मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या नफिल्ड कॉलेजमधून अर्थशास्त्रात डी.फिल पदवी मिळवली होती. त्यांना शिक्षणाबाबत बरीच आवड होती. त्यामुळे त्यांनी पंजाब विद्यापीठ आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकविण्यास सुरुवात केली होती.

1971 मध्ये डॉ. सिंह हे भारत सरकारमध्ये रुजू झाले आणि वाणिज्य मंत्रालयात आर्थिक सल्लागार बनले. 1972 मध्ये त्यांची अर्थ मंत्रालयाचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली. यानंतर त्यांनी अर्थ मंत्रालयाचे सचिव, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचे (यूजीसी) अध्यक्ष अशा अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले.

हे वाचलं का?

    follow whatsapp