Balasaheb Thackeray यांच्यावर निवडणूक आयोगानं ‘या’ दोन गोष्टींमुळे घातलेली बंदी?

मुंबई तक

ADVERTISEMENT

former shiv sena cheif balasaheb thackeray banned by the election commission because of these two things
former shiv sena cheif balasaheb thackeray banned by the election commission because of these two things
social share
google news

Balasaheb Thackeray and Election Commission: निलेश झाल्टे, मुंबई: शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मोदी-शाहांनी केलेल्या वक्तव्याविरोधात निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिल्यानंतर एका जुन्या प्रकरणानं डोकं वर काढलं आहे. हे प्रकरण आहे बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांना निवडणूक आयोगानं घातलेल्या बंदीचं. जुलै 1999 मध्ये युतीचं सरकार सत्तेवर होतं, त्यावेळी केंद्रीय निवडणूक आयोगाने बाळासाहेबांचा मतदानाचा अधिकार सहा वर्षांसाठी काढून घेतला होता. केवळ मतदानच नव्हे तर निवडणुकीलाही उभं राहण्यास मनाई करण्यात आली होती. हे प्रकरण नेमकं काय आहे हेच आपण जाणून घेऊया. (former shiv sena cheif balasaheb thackeray banned by the election commission because of these two things)

‘आता होऊ घातलेल्या 5 राज्यांतील विधानसभांच्या निवडणूक प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सरळसरळ धर्माच्या आधावर मते मागत आहेत. तरीही त्यांच्यावर काहीही कारवाई होत नाही. आता मोदी, शाहांसाठी नियम बदलले आहेत का?’ असा सवाल ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला केला आहे. त्यांनी निवडणूक आयोगाला याबाबत पत्रही पाठवले आहे. यावरुन बाळासाहेबांना आयोगानं घातलेल्या बंदीचा मुद्दा समोर आला आहे.

हे ही वाचा >> Nana Patekar : ‘नाना पाटेकरांचा चाहता, पण…’, टपली खालेल्या तरूणाने सांगितलं नेमकं काय घडलं?

1987 मध्ये विलेपार्लेच्या पोटनिवडणुकीत हिंदुत्वाचा प्रचार केला म्हणून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना निवडणुकीला उभे राहण्यास निवडणूक आयोगाने बंदी केली होती. तसेच, बाळासाहेब ठाकरेंचा मतदानाचा अधिकारही काढून घेण्यात आला होता. 2007 मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत बाळासाहेबांनी दीर्घ कालावधीनंतर मतदान केलं. बाळासाहेबांनी धर्माच्या नावे मतं मागितल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

“आम्ही ही निवडणूक हिंदूंच्या रक्षणासाठी लढतोय. आम्हाला मुस्लिम मतांची पर्वा नाही. हा देश हिंदूंचा आहे आणि तो त्यांचाच राहणार!”, या 1987 च्या पोटनिवडणुकीत केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळं बाळासाहेबांचा मतदानाचा हक्क 6 वर्षांसाठी काढून घेण्यात आला होता.

त्याच विलेपार्लेच्या विधानसभा पोटनिवडणुकीत बाळासाहेबांनी त्यांची दोन प्रसिद्ध विधानं केली होती. ती म्हणजे ‘गर्व से कहो हम हिंदू है’ आणि ‘मंदिर वहीं बनायेंगे..’ ह्या दोन विधानांमुळे बाळासाहेबांचं नाव देशभर झालं. तसंच भाजपलाही शिवसेनेसोबत युती जाहीर करावी लागली.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Shivsena : ‘काल जे घडलं तो ट्रेलर, 2024 ला….’ संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर आणि केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनेवरून राष्ट्रपतींनी बाळासाहेब ठाकरे यांचा मतदानाचा हक्क 6 वर्षांसाठी काढून घेतला होता. तेव्हा जुलै 1999 ला केंद्रात भाजपचं अटलबिहारी वाजपेयी सरकार आणि राज्यात शिवसेना-भाजप युतीचं सरकार होतं हे विशेष…

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT