लोकसभेवरून शिंदेंचा नेता भाजपला भिडला, 'सर्व पक्षांना संपवून भाजपला एकट्यालाच...'

मुंबई तक

ADVERTISEMENT

ramdas kadam criticizes bjp
ramdas kadam criticizes bjp
social share
google news

Lok sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीवरून सध्या देशातील राजकारण ढवळून निघाले आहे. जागा वाटपावरून खडाजंगी होण्याची चिन्हं सुरु असतानाच भाजप-शिवसेनेतूनही (BJP-shiv sena) दावे प्रतिदावे केले जात आहे. एकीकडे महाविकास आघाडी आणि वंचितमध्ये जागा वाटपावरून कोणतंच समीकरण जुळून येत नाही, त्यातच शिंदे गटाचे नेते माजी पर्यावरण मंत्री रामदार कदम (Ramdas Kadam) यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग  लोकसभा जागेच्या निवडणुकीवरून जोरदार निशाणा साधला आहे. त्यामुळे त्यांनी भाजपला दिलेला घरचा आहेर अनेकांना झोंबल्याने चर्चेला उधाण आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेवरून भाजप-शिवसेनेमध्ये तू तू मैं मैं सुरु आहे. त्यातच आता शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनच भाजपला घरचे आहेर दिले आहे. 

सगळीकडे आपणच

भाजपला लोकसभेच्या जागेवरून सुनावत असताना भाजपने सगळीकडे आपणच हा विचार करणे थांबवावा असा सल्लाही रामदास कदम यांनी दिला आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

'लोकसभेच्या जागेवर हक्क सांगताना तुम्ही रायगडवर पण हक्क सांगाल, रत्नागिरीमध्येही आम्हीच पण असं होत नाही. तुम्हाला सगळ्या पक्षाला संपवून तुम्हाला एकट्यालाच निवडून यायचे आहे का?' असा सवाल त्यांनी भाजपला केला आहे.

माझ्याला हात नका लावू

रामदार कदम यांनी भाजपला टोला लगावताना,'आम्ही दोघं भाऊ भाऊ, तुझं आहे ते वाटून खाऊ, आणि माझ्याला हात नका लावू असं आता होता कामा नये' असा टोला त्यांनी भाजपला लगावला आहे. 

ADVERTISEMENT

प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनीही नुकताच भाजपवर निशाणा साधत भाजपला छोटे पक्ष संपवायचे असल्याचे सांगून घरेच आहेर दिले होते. त्यानंतर आता रामदास कदम यांनीही सर्व पक्षाला संपवून भाजपला एकट्यालाच जिवंत राहायचे आहे असा गंभीर आरोपही त्यांनी त्यांच्यावर केला आहे. 

ADVERTISEMENT

राजकारण तापणार

रामदास कदम यांनी लोकसभेच्या जागेवरून स्पष्टपणे सांगितले की, 'आम्ही कोणत्याही परिस्थितीत रत्नागिरीचीदेखील जागा सोडणार नाही. ती आम्ही लढवणारच कारण आमच्या हक्काची ती जागा असल्याचे सांगितले.' रामदास कदम यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे आता रत्नागिरी-सिंधुदुर्ग जागेवरून राजकारण तापणार असल्याचे दिसून येत आहे.

हे ही वाचा >> 'सत्तातुरांना ना भय ना लज्जा!', 'सामना'तून सरकारचे वाभाडे

    follow whatsapp

    ADVERTISEMENT