Gulabrao Patil : ''अर्थ खात्यासारखे नालायक खाते पाहिले नाही'', शिंदेंच्या मंत्र्याचा अजितदादांच्या खात्यावर निशाणा

मुंबई तक

Gulabrao Patil News : सरकारमध्ये राज्य मंत्र्याला फारसे करून घेता येत नाही.पाणी पुरवठा खाते आले आणि आमच्या लोकांना महत्व आले. मी देव दुत नाही,गरिबी जवळून पाहिली आहे. कष्ट करणाऱ्यांचे पैसे खाणाऱ्यांचे हात लुळे झाल्या शिवाय राहणार नाही. परमेश्वराने माझ्या हातून हे काम करायचे ठरवले असेल म्हणून झाले,असेही पाटील यावेळी म्हणाले.

ADVERTISEMENT

शिवसेनेचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी अजित पवारांच्या अर्थ खात्यावर टीका
gulabrao patil big statement finance account is worthless account say eknath shinde minister maharashtra politics ajit pawar
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अर्थ खात्यासारखे नालायक खाते पाहिले नाही

point

दहा वेळा फाईल निगेटिव्ह होऊन यायची

point

फॉलोअपमुळे आमचे काम झाले

Gulabrao Patil News : मनीष जोग, जळगाव :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी अजित पवारांच्या अर्थ खात्यावर टीका केली आहे. ''अर्थ खात्यासारखे नालायक खाते पाहिले नाही.दहा वेळा फाईल निगेटिव्ह होऊन यायची.मात्र फॉलोअपमुळे आमचे काम झाले'', असा निशाणा गुलाबराव पाटलांनी (Gulabrao Patil) अजित पवारांच्या (Ajit Pawar) खात्यावर साधला आहे.( gulabrao patil big statement finance account is worthless account say eknath shinde minister maharashtra politics ajit pawar) 

हात पंप आणि वीज पंप दुरुस्ती आणि देखभाल कर्मचारी संघटनेच्या वतीने आज जळगावमध्ये मंत्री गुलाबराव पाटील यांचा कृतज्ञता सोहळ्याचं आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमातून गुलाबराव पाटील बोलत होते.''तुम्ही आज माझ्या सत्कार सन्मानासाठी जी शाल दिली तिची ऊब मी कधीही विसरू शकणार नाही.तुमची शाल मला कोणत्याच विरोधकांची थंडी वाजू देणार नाही, असे गुलाबराव पाटील म्हणाले आहेत.

हे ही वाचा : Eknath Shinde : ''मुख्यमंत्री' हा शब्द काय जड...'', लाडकी बहिणवरून शिंदेंच्या मंत्र्याने अजित पवार गटाला सुनावलं

सरकारमध्ये राज्य मंत्र्याला फारसे करून घेता येत नाही.पाणी पुरवठा खाते आले आणि आमच्या लोकांना महत्व आले. मी देव दुत नाही,गरिबी जवळून पाहिली आहे. कष्ट करणाऱ्यांचे पैसे खाणाऱ्यांचे हात लुळे झाल्या शिवाय राहणार नाही. परमेश्वराने माझ्या हातून हे काम करायचे ठरवले असेल म्हणून झाले,असेही पाटील यावेळी म्हणाले.  

जनेतल पाणी पाजण्याचं काम करण्याचे भाग्य मला मिळाले.आयुष्यात आता लोकांच्या साठीच काम करायचे आहे. राजकारणात आपण बडेजाव केला नाही.पणं जिथे गरज आहे तिथे मंत्री म्हणून ते केले, असे देखील पाटील यांनी यावेळी म्हटले. 

हे वाचलं का?

    follow whatsapp