Nawab Malik: ‘सरडा, आत्महत्या.. सुषमा अंधारेंच्या ‘त्या’ एका विधानाने.. फडणवीस सापडले कोंडीत?

रोहित गोळे

ADVERTISEMENT

how did shiv sena ubt leader sushma andhare catch devendra fadnavis and bjp in a dilemma after nawab malik decided to go with ruling party
how did shiv sena ubt leader sushma andhare catch devendra fadnavis and bjp in a dilemma after nawab malik decided to go with ruling party
social share
google news

Sushma Andhare catch Devendra Fadnavis and BJP in a dilemma: मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) हे आज (7 डिसेंबर) हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात दाखल झाले. पण यावेळी त्यांच्या एका कृतीमुळे थेट राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हेच टार्गेटवर आले. कारण आतापर्यंत आपण कोणत्या गटासोबत आहोत हे स्पष्ट न केलेल्या मलिकांनी आपण अजित पवारांसोबत (Ajit Pawar) असल्याचं दाखवून देण्यासाठी विधानसभेत सत्ताधारी बाकावर जाऊन बसणं पसंत केलं. त्यांच्या याच कृतीनंतर विरोधकांनी भाजपवर टीकेची झोड उठवली. त्यातही शिवसेना (UBT)च्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर तर अत्यंत जहरी शब्दात टीका केली. (how did shiv sena ubt leader sushma andhare catch devendra fadnavis and bjp in a dilemma after nawab malik decided to go with ruling party)

आता सुषमा अंधारे यांची हीच टीका फडणवीसांना चांगलीच झोंबल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. सगळ्यात आपण पाहूयात सुषमा अंधारे यांनी मलिकांच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीसांवर नेमकी काय टीका केली होती.

हे ही वाचा >> Devendra Fadnavis: ‘सत्ता येते आणि जाते, पण…’, फडणवीसांचं अजितदादांना खुलं पत्र, महाराष्ट्रात मोठी खळबळ!

‘देवेंद्र फडणवीस भाऊ सरडासुध्दा आत्महत्या करेल हो!’

‘पूजा चव्हाणचा बलात्कार करून हत्या केल्याचे आरोप संजय राठोड यांच्यावर भाजपने केले. त्याच संजय राठोडांना मंत्रिमंडळाच्या पंगतीला बसवून घेतले आणि तेच फडणवीस आज नवाब मलिक यांचे मंत्रिपद का काढून घेतले नव्हते असा प्रश्न विचारतात? देवेंद्र फडणवीस भाऊ सरडासुध्दा आत्महत्या करेल हो!!’ असं विधान सुषमा अंधारे यांनी केलं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

यानंतर ठाकरे गटाच्या विरोधाची धार आणखी वाढली. याच मुद्द्यावरून एकीकडे विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी फडणवीसांना अडचणीत आणणारे सवाल सभागृहात उपस्थित केले.

खरं तर यावेळी देवेंद्र फडणवीसांनी उत्तर देताना मलिकांची काहीशी पाठराखण केली होती. पण त्यावेळी अजित पवार गट किंवा शिवसेना (शिंदे गट) यांच्या आमदारांनी म्हणावी तशी साथ फडणवीसांना दिली नाही आणि इथेच नेमकी ठिणगी पडली.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Nawab Malik : अजित पवारांचा कॉल, शरद पवारांना धक्का; मलिक महायुती बरोबर?

दुसरीकडे ठाकरे गटाने सोशल मीडियावर अत्यंत आक्रमकपणे हा मुद्दा उचलून धरला. याच मुद्द्यावरून त्यांनी काही व्हीडिओ तयार केले किंवा काही मीम्स तयार केले.

ADVERTISEMENT

दरम्यान, नवाब मलिक यांना महायुतीत घेणं हे आपल्याला अधिक अडचणीचं होईल हे भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात येताच त्यांनी अवघ्या काही तासात मलिकांना महायुतीत घेण्यासाठी विरोध केला.

ज्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी एक खुलं पत्रच अजित पवार यांना लिहलं. पाहा या पत्रात नेमकं काय म्हटलंय.

श्री. अजितदादा पवार,
उपमुख्यमंत्री महाराष्ट्र तथा अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

सस्नेह नमस्कार,

माजी मंत्री आणि विधानसभा सदस्य श्री. नवाब मलिक हे आज विधिमंडळ परिसरात येऊन कामकाजात सहभागी झाले होते. विधानसभा सदस्य म्हणून त्यांचा तो अधिकार सुद्धा आहे. त्यांच्याबाबत आमची वैयक्तिक शत्रूता अथवा आकस अजिबात नाही, हे मी प्रारंभीच स्पष्ट करतो.

परंतू, ज्या पद्धतीचे आरोप त्यांच्यावर आहेत, ते पाहता, त्यांना महायुतीमध्ये घेणे योग्य ठरणार नाही, असे आमचे मत आहे.

सत्ता येते आणि जाते. पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा आहे. सद्या ते केवळ वैद्यकीय आधारावर जामीन मिळाल्याने बाहेर आहेत. त्यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यास आपण त्यांचे जरूर स्वागत करावे. मात्र अशाप्रकारचे आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणे, हे योग्य होणार नाही, असे आमचे स्पष्ट मत आहे. आपल्या पक्षात कोणाला घ्यायचे, हा सर्वस्वी आपला अधिकार आहे, हे मान्यच आहे. परंतू, त्यामुळे महायुतीला बाधा पोहोचणार नाही, याचा विचारही प्रत्येक घटक पक्षाला करावाच लागत असतो, त्यामुळे आमचा या गोष्टीला विरोध आहे.

त्यांना देशद्रोह्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक झाली तरी त्यांना मंत्रिपदावर कायम ठेवणाऱ्या तत्कालिन मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारच्या विचारांशी आम्ही सहमती दाखवू शकणार नाही. आपण आमच्या भावनांची नोंद घ्याल, अशी मला आशा आहे.

आपला
(देवेंद्र फडणवीस)

असं पत्र देवेंद्र फडणवीस यांनी लिहलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT