NCP: शरद पवारांच्या ‘हनुमंती’ डावाने अजितदादांचा केला ‘करेक्ट कार्यक्रम?’

रोहित गोळे

Sharad Pawar vs Ajit Pawar: शरद पवार यांनी राजकारणातील कुस्तीत अजित पवार यांना मात दिली असून त्यांनी आपली खेळी नेमकी कशी खेळली हेच आपण सविस्तरपणे या लेखातून जाणून घेऊया.

ADVERTISEMENT

how ncp president sharad pawar defeated ajit pawar in political wrestling
how ncp president sharad pawar defeated ajit pawar in political wrestling
social share
google news

Sharad Pawar Political Wrestling: मुंबई: शरद पवार (Sharad Pawar) म्हणजे राजकारणातील कुस्तीच्या फडातील तेल लावलेल पैलवान! जेव्हा भल्याभल्यांना वाटतं की, आपण पवारांना खिंडीत गाठलंय.. त्यांचा खेळ खल्लास झालाय.. तेव्हाच शरद पवार असा काही डाव टाकतात की, त्याच भल्याभल्यानं चीतपट होण्याशिवाय पर्याय नसतो. हे अवघ्या महाराष्ट्राने आतापर्यंत अनेकदा पाहिलं आहे. पण स्वत:च्याच पुतण्याला एकदा नव्हे तर दोनदा राजकीय पटलावर आस्मान दाखविण्याची किमया ही शरद पवार यांनी केली आहे. दोनच दिवसांपूर्वी शरद पवारांनी असा काही ‘हनुमंती’ डाव टाकला की, अजितदादांचा (Ajit Pawar) करेक्ट कार्यक्रमच झाला असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. (how ncp president sharad pawar defeated ajit pawar in political wrestling)

शरद पवार यांनी अजित दादांवर कसा टाकला हनुमंती डाव?

महाविकास आघाडीची सत्ता गेल्यापासून अजित पवार हे बंडाच्या तयारीत असून राष्ट्रवादीच्या आमदारांना घेऊन ते भाजपसोबत जाणार असल्याची जोरदार चर्चा ही राजकीय वर्तुळात रंगली होती.

अखेर अजित पवारांनी पुढं येत या सगळ्याबाबत खुलासा केला होता. आपण राष्ट्रवादीतच शेवटपर्यंत राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. त्यांच्याविषयी सुरु असलेल्या चर्चांचा देखील त्यांनी इन्कार केला होता. पण या सगळ्या घडामोडीनंतर अजित पवारांनी ‘सकाळ’ वृत्तपत्राला मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये त्यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली होती.

हे ही वाचा >> NCP मध्ये शरद पवारच ‘बिग बॉस’, एका दगडात किती पक्षी मारले?

दुसरीकडे ईडीच्या कारवायांमुळे राष्ट्रवादीचा एक गट भाजपसोबत जाण्यासाठी आग्रही असल्याचं बोललं जात होतं. परंतु भाजपसोबत जाण्यासाठी शरद पवार तयार नसल्याचं समोर आलेलं.

हे वाचलं का?

    follow whatsapp