Maratha Reservation : 'कुणाचा मेसेज आला होता?', विधानसभेत प्रचंड घमासान

मुंबई तक

Maharashtra Vidhan Sabha : आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीवर महाविकास आघाडीने बहिष्कार टाकला. याच मुद्द्यावरून भाजपच्या आमदारांनी महाविकास आघाडीला घेरलं.

ADVERTISEMENT

आरक्षणाच्या मुद्द्यावरून विधानसभेत प्रचंड गदारोळ झाला.
आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केला.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

आरक्षणाच्या मुद्द्यावरून विधानसभेत प्रचंड गोंधळ

point

सर्वपक्षीय बैठकीवर बहिष्कार टाकल्यानंतर महायुती महाविकास आघाडीविरोधात आक्रमक

point

आशिष शेलारांचे महाविकास आघाडीवर गंभीर आरोप

Maratha Reservation, Maharashtra Politics : महाराष्ट्रात आरक्षणाचा मुद्दा ज्वलंत बनला आहे. या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महायुती सरकारने बैठक बोलावली होती. पण, त्या बैठकीवर महाविकास आघाडीने बहिष्कार टाकला. मविआच्या बहिष्काराच्या भूमिकेवरून महायुतीच्या आमदारांनी विरोधकांना विधानसभेत घेरले. भाजपचे आमदार अमित साटम, आशिष शेलार, नितेश राणे यांच्यासह सत्ताधारी आमदारांनी प्रचंड गोंधळ केला. (The MLAs of Mahayuti became aggressive after Maha vikas Aghadi leaders were absent from the all-party meeting on the reservation issue)

भाजपचे आमदार अमित साटम यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून विरोधी पक्षाचे नेते आरक्षणावरील सर्वपक्षीय बैठकीला गैरहजर राहिल्याचा मुद्दा मांडला.

हेही वाचा >> मोबाईल सुरु केला अन्...; मिहीर शाहाला पोलिसांनी कसे पकडले? 

महाराष्ट्रात जातीय तेढ निर्माण होत आहे. आरक्षणावर चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली होती. विरोधकांनी त्यावर बहिष्कार घातला. विरोधकांना फक्त राजकारण करायचं आहे. यांना ना ओबीसींची पडलीये, ना यांना मराठ्यांची पडलीये. विरोधकांनी इथे जाहीर करावं की, ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी तुमचा पाठिंबा आहे की नाही?, असा सवाल साटम यांनी केला.

पहा विधानसभेत काय घडलं?

 

हे वाचलं का?

    follow whatsapp