Govindgiri: ‘मी मोदींची शिवाजी महाराजांसोबत तुलना केली नाही, फक्त..’, गोविंदगिरी महाराजांचा यू-टर्न

रोहित गोळे

Ram Mandir Inauguration Govindgiri Maharaj: गोविंदगिरी महाराज यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना पंतप्रधान मोदींसोबत केली होती. त्यावरून टीका झाल्यानंतर आता त्यांनी त्यांच्या विधानाबाबत यू-टर्न घेतला आहे.

ADVERTISEMENT

i didnt compare pm modi with shivaji maharaj govindgiri maharaj u turns on yesterday statement
i didnt compare pm modi with shivaji maharaj govindgiri maharaj u turns on yesterday statement
social share
google news

Ayodhya Ram Mandir Inauguration Govindgiri Maharaj: अयोध्या: अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा हा काल (22 जानेवारी) अत्यंत जल्लोषात पार पडला. याच सोहळ्यानंतर झालेल्या भाषणात गोविंदगिरी महाराज (Govindgiri Maharaj) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना केली होती. ज्यानंतर त्यांच्यावर अनेकांनी टीका केली आहे. याच टीकेनंतर गोविंदगिरी महाराज यांनी स्पष्टीकरण दिलं असून आता असं म्हटलं की, मी शिवाजी महाराजांची तुलना मोदींशी केली नाही. (i didnt compare pm modi with shivaji maharaj govindgiri maharaj u turns on yesterday statement)

‘मोदींची छत्रपती शिवाजी महाराजांसोबत तुलना केलीच नाही, फक्त…’

शिवाजी महाराजांसोबत पंतप्रधान मोदींची तुलना केल्यानंतर गोविंदगिरी महाराज यांनी टीव्ही 9 मराठी या वृत्तवाहिनीशी बोलताना स्पष्टीकरण दिलं आहे. पाहा नेमकं गोविंदगिरी महाराज नेमकं काय म्हणाले…

हे ही वाचा>> Ayodhya Ram Mandir Live: ‘शिवाजी राजांना संन्यास घ्यायचा होता..’, PM मोदींसमोर ‘त्या’ महाराजांचं वक्तव्य

माझ्या आयुष्यात मी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना ही कोणाशीही करणार नाही. भगवान श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यानंतर मला छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वश्रेष्ठ वाटतात. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेणं याचा अर्थ अन्य कुणाला त्यांच्यासारखं समजणं असा होत नसतो.

फक्त शिवाजी महाराजांच्या काही गुणांचं अनुसरण हे काही नेते करत आहेत. तशा प्रकारच्या गुणांचं अनुसरण करणारे नेते आपले जे काही आहेत त्यामध्ये आपले माननीय पंतप्रधान सुद्धा आहेत. हे सांगायला मला कुठल्याही प्रकारचा संकोच मला तेव्हाही वाटला नाही आणि आताही वाटत नाही.

असं म्हणत गोविंदगिरी महाराज यांनी त्यांच्या कालच्या विधानावरून यू-टर्न घेतला आहे.

हे ही वाचा>> Ram Mandir : ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान’, रोहित पवार गोविंदगिरी महाराजांवर भडकले

PM मोदींसमोर गोविंदगिरी म्हणाले की, “आपल्याला आज ‘श्रीमंत योगी’ मिळालाय..”

वाचा कालच्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर गोविंद गिरी नेमकं काय म्हणाले होते.

हे वाचलं का?

    follow whatsapp