NCP: अन् शरद पवारांच्या समोरच कार्यकर्त्याने थेट अजितदादांनाच सुनावलं, तुम्हाला…

मुंबई तक

ADVERTISEMENT

in front of sharad pawar the ncp worker directly spoke harsh words to ajit pawar
in front of sharad pawar the ncp worker directly spoke harsh words to ajit pawar
social share
google news

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केल्यानंतर संपूर्ण पक्षातच एकच खळबळ माजली. अनेक नेते हे शरद पवार यांच्या या निर्णयावर सर्वप्रथम अवाक् झाले. हा सगळा प्रकार यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहातच घडला. कारण येथेच पुस्तक प्रकाशन सोहळ्यात शरद पवार यांनी राजीनाम्याची घोषणा केली. त्यानंतर तेथील प्रत्येक नेत्याने शरद पवारांनी आपला निर्णय मागे घ्यावा असं सांगितलं. मात्र, या सगळ्यांच्या विपरित अजित पवार यांनी भूमिका घेतली. अजित पवारांनी (Ajit Pawar) घेतलेल्या या भूमिकेनंतर एका कार्यकर्त्याने थेट शरद पवारांसमोरच अजितदादांना खडे बोल सुनावले. (in front of sharad pawar the ncp worker directly spoke harsh words to ajit pawar)

ADVERTISEMENT

शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला तरी ते आपल्यासोबत कायम असणार आहेत. काँग्रेसमध्येही खर्गे हे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत पण पक्ष सोनिया गांधीच चालवतात असं उदाहरण अजित पवार यांनी दिलं. पण अजिबात पवार यांनी दिलेलं हे उदाहरण कार्यकर्त्यांना अजिबात आवडलं नाही. त्यामुळे अजित पवार यांना एका कार्यकर्त्याने तिथल्या तिथेच खडे बोल सुनावलं.

कार्यकर्त्याने अजित पवारांना काय सुनावलं?

अजित पवारांनी काँग्रेसचं उदाहरण दिल्यानंतर चिडलेल्या कार्यकर्त्याने थेट सांगितलं की, ‘दादा तुम्ही काँग्रेसचं उदाहरण दिलं.. आज काँग्रेसची काय परिस्थिती आहे ती तुम्ही बघा.. काँग्रेसचे गांधी परिवाराचे अध्यक्ष नाहीत.. काँग्रेसच्या चुकीच्या निर्णयामुळे काँग्रेसची आजची काय परिस्थिती आहे ते बघा..’

हे वाचलं का?

हे ही वाचा>> ब्रेकिंग न्यूज: शरद पवारांच्या निर्णयानंतर हाय होल्टेज ड्रामा! जयंत पाटील ढसाढसा रडले

‘के के शर्मा हे उत्तर प्रदेशचे राष्ट्रीय महासचिव आहेत उत्तर प्रदेशचे त्यांना विचारा काँग्रेसला लोकसभेत 5 हजार मतं मिळत नाहीत. विधानसभेत 1000 मतं मिळत नाही. या चुकीच्या निर्णयामुळे काँग्रेसची परिस्थिती झाली आहे. पवार साहेबांशिवाय इतर कोणीही राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आम्हाला मान्य नाही. पवार साहेबांच्या शेवटच्या श्वासापर्यंत तेच राष्ट्रीय अध्यक्ष राहणार म्हणजे राहणार. हे तुम्हाला मान्य करावं लागेल.’ असं कार्यकर्त्याने ठणकावून सांगितलं.

अजित पवार नेमकं काय म्हणालेले?

‘पवार साहेबांनी निर्णय घेतलाय. मी आता काकींशी पण बोललोय.. त्या म्हणाल्या.. अजित ते निर्णय अजिबात मागे घेणार नाहीत. ते तशा पद्धतीने ठाम आहोत. ही साहेबांची भूमिका आहे. तुम्ही पण लगेच भावनिक होऊन.. आम्हाला पर्याय नाही.. अरे साहेब आहेतच ना.. अरे पर्याय नाही.. दुसरा पर्याय कुणाचा आहे मग तुम्हाला?’

ADVERTISEMENT

‘सगळ्यांच्या भावना साहेबांनी ऐकलेल्या आहेत. पाहिलेल्या आहेत. आताही पाहताहेत. सगळ्या वडिलधाऱ्यांचं, जिवाभावाची साथ देणाऱ्या सगळ्यांचं ऐकलं आहे. तुम्ही एक गैरसमज करून घेताहेत की, पवार साहेब अध्यक्ष नाही म्हणजे पक्षामध्ये नाही, अशातला भागच नाही.’

ADVERTISEMENT

‘आज काँग्रेसमध्ये अध्यक्ष आहेत खर्गे, पण काँग्रेस चालली आहे सोनियाजींकडे बघून. त्यामुळे पवारसाहेबांच्या वयाचा विचार करता, साहेबांशी आणि सगळ्यांशी चर्चा करून एका नेतृत्वाकडे आपण ही जबाबदारी देऊ पाहतोय. ते नेतृत्व साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पार्टीचं काम करेल. शेवटी साहेब म्हणजेच पार्टी आहे, हे येड्यागबाळ्याने पण सांगण्याचं कारण नाही. त्यामुळे आपण जे सारखं सारखं सांगताहेत… आता शरद पवार साहेबांनी तो निर्णय घेतलेला आहे.’

हे ही वाचा>> शरद पवारांची निवृत्ती : कार्यकर्त्यांचा सभागृहातच गोंधळ, घोषणा मागे घेण्याची मागणी

‘पवार साहेब लोकशाहीमध्ये जनतेचं ऐकतात हेही मी बघितेलेले आहे. त्यामुळे साहेबच आपले. त्यामुळे चव्हाण प्रतिष्ठानला यायचं, सिल्व्हर ओकला यायचं किंवा आणखी कुठे कार्यक्रम असतील तर साहेब आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करणार आहे.’ असं अजित पवार यावेळी म्हणाले.

मात्र, अजित पवार यांचं हेच बोलणं सभागृहात उपस्थित असलेल्या अनेक नेत्यांना पटलं नाही. त्यामुळे एका कार्यकर्त्याने त्याचवेळी मीडियसमोरच अजित पवार यांना खडे बोल सुनावून टाकले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT