Independence Day: स्वातंत्र्यदिनी PM मोदींच्या मोठ्या घोषणा! महिला आणि तरूणांसाठी खास काय?   

रोहिणी ठोंबरे

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकावून देशाला संबोधित केले. त्याचबरोबर विकसित भारतासाठी नवा संकल्प केला. यामध्ये महिला आणि तरूणांसाठी कोणत्या खास घोषणा केल्या गेल्या याविषयी जाणून घेऊयात.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

विकसित भारताच्या संकल्पात महिला आणि तरूणांसाठी खास काय?   

point

महिलांवरील अत्याचार ही काळजीची बाब- PM मोदी

point

शिक्षा नितीबद्दल पीएम मोदी काय म्हणाले?

Independence Day 2024 PM Modi : भारत आज 15 ऑगस्ट रोजी आपला 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. देशभरात स्वातंत्र्य दिन मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात आणि लोक राष्ट्रध्वज फडकावला जातो. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकावून देशाला संबोधित केले. त्याचबरोबर विकसित भारतासाठी नवा संकल्प केला. यामध्ये महिला आणि तरूणांसाठी कोणत्या खास घोषणा केल्या गेल्या याविषयी जाणून घेऊयात. (Independence Day 2024 PM Modi big announcements about vikasit bharat What is special for women and youth in it)

आज स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिले भाषण आहे. या भाषणात पीएम मोदींनी त्यांच्या सरकारच्या आतापर्यंतच्या कामगिरीचा लेखाजोखा मांडला. याशिवाय रोजगार, सामाजिक-आर्थिक क्षेत्रातील कामगिरी याविषयांवरही भाष्य केले. तसेच विकसित भारताबाबत सरकारची रूपरेषाही सांगितली. सीमा सुरक्षा आणि दहशतवाद यांसारख्या मुद्द्यांवरही त्यांनी आपल्या भाषणात वक्तव्य केले.

हेही वाचा : PM Modi Speech : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मोठा निर्धार, लाल किल्ल्यावर घोषणांचा पाऊस, म्हणाले; "२०३६ चं ऑलिम्पिक..."

विकसित भारताच्या संकल्पात महिला आणि तरूणांसाठी खास काय?   

"तरुण असो वा महिला किंवा आदिवासी, सर्वांनी गुलामीविरोधात लढा दिला. 1857 च्या आधीही स्वातंत्र्य संग्रामात अनेक आदिवासी क्षेत्रात लढा दिला होता याला इतिहास साक्षीदार आहे. त्यावेळच्या लोकसंख्येच्या हिशेबाने 40 कोटी लोकांनी एक स्वप्न आणि संकल्प घेऊन पुढे जाण्याचा निर्णय घेतला होता. जर 40 कोटी लोक गुलामीचे साखळदंड तोडू शकतात तर 140 कोटी नागरिक आणि त्यांचे कुटुंबीय प्रत्येक अडचणीवर मात करुन भारताला समृद्ध करू शकतात. आपण 2047 पर्यंत विकसित भारताचं लक्ष्य पार करू शकतो." असे पंतप्रधान मोदी त्यांच्या भाषणात म्हणाले.

महिलांवरील अत्याचार ही काळजीची बाब- PM मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात महिलांविरोधात होणाऱ्या गुन्ह्यांना गांभीर्यानं घेण्याची आणि दोषींमध्ये भय निर्माण होण्याची गरज आहे असे म्हटले. ते म्हणाले, "जेव्हा बलात्काराच्या घटना होतात तेव्हा त्या माध्यमांममध्ये चर्चेला येतात मात्र असे राक्षसी कृत्य करणाऱ्यांना शिक्षा होते तेव्हा त्याच्या बातम्या होत नाहीत. मला वाटतं अशी शिक्षा होणाऱ्यांच्या बातम्या व्हाव्यात, ही भीती गरजेची आहे. महिलांचं योगदान आणि नेतृत्व यात देश पुढे जात आहे. मात्र त्याबरोबर महिलांवरील अत्याचार ही काळजीची बाब आहे.”

हे वाचलं का?

    follow whatsapp