इंडिया टुडे GDB सर्व्हे: महाराष्ट्र सेफ की अनसेफ, सार्वजनिक सुरक्षेत कितवा क्रमांक.. कोण आहे अव्वल स्थानी?
India Today GDB Survey नुसार, सार्वजनिक सुरक्षा केवळ गुन्हेगारीच्या आकडेवारीवर अवलंबून नाही तर लोकांच्या सुरक्षिततेच्या भावनेवर देखील अवलंबून असते. 21 राज्ये आणि 1 केंद्रशासित प्रदेशातील 9188 लोकांना सुरक्षा, लिंगभाव आणि भेदभाव यावर प्रश्न विचारण्यात आले. महाराष्ट्रात काय परिस्थिती होती ते जाणून घ्या?
ADVERTISEMENT

India Today GDB Survey: इंडिया टुडेनेHow India Lives च्या सहकार्याने सकल घरगुती वर्तन (GDB) वर एक सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणात, 21 राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील 9188 लोकांना नागरी वर्तन, सार्वजनिक सुरक्षा, लिंग विचार आणि भेदभाव यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर 30 प्रश्न विचारण्यात आले. महाराष्ट्रातील सार्वजनिक सुरक्षेबाबत अनेक मोठे दावे केले जातात. पण ते खरेच तसे आहेत हे आम्ही सर्व्हेच्या माध्यमातून जाणून घेतलं आहे. इंडिया टुडेच्या या मुद्द्यावरील सर्वेक्षणात महाराष्ट्रातील सार्वजनिक सुरक्षेबाबत आकडेवारी समोर आली आहे. सर्वेक्षणाच्या निकालांवरून असे दिसून येते की सार्वजनिक सुरक्षेच्या बाबतीत महाराष्ट्राचा नंबर काहीसा खाली गेला आहे.
सार्वजनिक सुरक्षेवर केलेल्या एका सर्वेक्षणातून असे दिसून आले की लोकांची सुरक्षिततेची भावना राज्यांनुसार वेगवेगळी असते. त्यांच्या परिसरातील असे काही भाग आहेत का जिथे त्यांना असुरक्षित वाटते असे विचारले असता, केरळने सर्वोत्तम कामगिरी केली, त्याच वेळी याबाबतीत उत्तर प्रदेश हा याबाबत सर्वात खालच्या क्रमांकावर म्हणजेच इथे असुरक्षिततेची भावना अधिक असल्याचं लोकं म्हणतात. तर याबाबत महाराष्ट्र हा पाचव्या क्रमांकावर आहे.
सार्वजनिक सुरक्षेत केरळ अव्वल, महाराष्ट्र कुठे?
सर्वेक्षणाच्या निकालांवरून असे दिसून आले आहे की, सार्वजनिक सुरक्षेच्या बाबतीत केरळ 0.662 च्या प्रभावी निर्देशांकासह देशात पहिल्या क्रमांकावर आहे. यानंतर हिमाचल प्रदेश, ओडिशा, प. बंगाल आणि पाचव्या क्रमांकावर महाराष्ट्र येतो. तर 0.132 निर्देशांकासह उत्तर प्रदेश सर्वात खालच्या स्थानावर आहे.
| Rank 2025 | State | Public Safety index |
| 1 | Kerala | 0.66215731 |
| 2 | Himachal Pradesh | 0.638379647 |
| 3 | Odisha | 0.629447859 |
| 4 | West Bengal | 0.623444875 |
| 5 | Maharashtra | 0.613952955 |
| 6 | Haryana | 0.580901442 |
| 7 | Uttarakhand | 0.577662817 |
| 8 | Bihar | 0.553134752 |
| 9 | Tamil Nadu | 0.547784134 |
| 10 | NCT of Delhi | 0.530762461 |
| 11 | Jharkhand | 0.462419342 |
| 12 | Telangana | 0.449301747 |
| 13 | Gujrat | 0.431456267 |
| 14 | Madhya Pradesh | 0.393064961 |
| 15 | Assam | 0.378352539 |
| 16 | Chhattisgarh | 0.378226046 |
| 17 | Chandigarh | 0.369060449 |
| 18 | Andhra Pradesh | 0.337440879 |
| 19 | Rajasthan | 0.329649794 |
| 20 | Karnataka | 0.280125105 |
| 21 | Punjab | 0.261222803 |
| 22 | Uttar Pradesh | 0.132473438 |
या प्रश्नांच्या आधारे करण्यात आले सर्वेक्षण:
प्रश्न. तुमच्या भागात महिलांचा छळ किंवा छेडछाड ही एक सामान्य समस्या आहे का?










