Maratha Reservation : 'शिवरायांच्या नावाने खोटं बोलू नका', आव्हाडांनी CM शिंदेंना सुनावलं
Jitendra Awhad Criticize Eknath Shinde, Maratha Reservation : या विधेयकावर आता शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'मुख्यमंत्री साहेब, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने खोटं बोलू नका', अशी टीका आव्हाडांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर केली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

मराठा आरक्षणावरून सरकार वेळ मारून नेतंय

मुख्यमंत्री शपथ पूर्ण न करताच स्वत:ची पाठ थोपटतायत

जितेंद्र आव्हाड शिंदे सरकारवर भडकले
Jitendra Awhad Criticize Eknath Shinde, Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी सरकारने आज विशेष अधिवेशन बोलावलं होतं. या अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकऱ्यांत 10 टक्के आरक्षण देणारे विधेयक विधानसभेच्या पटलावर सादर केले होते. हे विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर झाले. त्यानंतर विधानपरीषदेत हे विधेयक एकमताने मंजूर झाले. या विधेयकावर आता शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'मुख्यमंत्री साहेब, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने खोटं बोलू नका', अशी टीका आव्हाडांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर केली आहे. (jitendra awhad criticize cm eknath shinde maratha reservation spcial session manoj jarange patil)
जितेंद्र आव्हाडांच ट्विट जसंच्या तसं
''मुख्यमंत्री साहेब,
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने खोटं बोलू नका..!!''
''मराठा आरक्षणावरून गेले अनेक महिने सरकार फक्त वेळ मारून नेण्याचं काम करत आहे.आरक्षणाला आमचा विरोध नाही.त्यामुळे सरकारने याविषयीच्या कोणत्याही निर्णयात स्वत:ची पाठ थोपटून घेण्याचे कारण नाही.आरक्षणाचा निर्णय हा सर्वपक्षीय एकमतानेच झालेला निर्णय असेल,हे लक्षात असू द्या.''
हे ही वाचा : Manoj Jarange : 'तुम्ही किती दिवस फसवणार?'