Manoj Jarange : 'तुम्ही किती दिवस फसवणार?', जरांगे शिंदे सरकारवर भडकले
Manoj Jarange Patil On Special Session, Maratha Reservation : अधिसूचना तुम्हीच काढता आणि अंमलबजावणी तुम्हीच करणार नाही? मग अधिसूचना काढलीच कशाला? हे जर आरक्षण तुम्हाला द्यायचं होतं, मग अधिसूचना काढली कशाला? असे सवाल देखील जरांगेंनी सरकारला केले आहेत.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
विधानसभेत मराठा आरक्षणाचे विधेयक एकमताने मंजूर
फाटक्या कपड्यातल्या माय-बाप मराठ्यांची चेष्ठा करताय
आडमूठी भूमिका असती तर सहा महिने सुद्धा दिले नसते
Manoj Jarange Patil On Special Session, Maratha Reservation : राज्य सरकारने बोलावलेल्या विशेष अधिवेशनात विधानसभेत मराठा आरक्षणाचे विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकऱ्यांत 10 टक्के आरक्षण देणारे विधेयक विधानसभेच्या पटलावर सादर केले होते. आता हे विधेयक विधानपरीषदेतही एकमताने मंजूर झाले आहे. या विधेयकावर आता मराठा समाजाने नाराजी व्यक्त केली आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी (Manoj jarange Patil) देखील या विधेयकावर गंभीर आरोप केला आहे. (manoj jarange patil angry on ekanath shinde government 10 percent reservation on maratha community special session)
ADVERTISEMENT
मनोज जरांगे पाटील माध्यमांशी बोलत होते. यावेळी मराठा आरक्षणावर सरकारने काढलेल्या विधेयकावर मनोज जरांगे पाटलांनी नाराजी व्यक्त केली. 'जी मागणी सरकारने गांभिर्याने घेण्याची गरज होती.ज्या मागणीसाठी उठावच नव्हता. ज्या मागणीपासून सरकारला धोकाच नव्हता. ती मागणी तुम्ही मंजूर केलीत आणि ज्यासाठी मराठा समाज आक्रोश करतोय, सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करा म्हणतोय, तर तुम्ही या माता, माऊलींना, गोर-गरीबांना, फाटक्या कपड्यातल्या माय-बाप मराठ्यांची चेष्ठा करताय. कोण हे सहन करणार आहे, असा संताप जरांगेंनी सरकारवर व्यक्त केला. तसेच ही काय आडमूठी भूमिका नाही. आडमूठी भूमिका असती तर सहा महिने सुद्धा दिले नसते, असे जरागेंनी स्पष्ट केले.
हे ही वाचा : Maratha Reservation सुप्रीम कोर्टात टिकणार का? CM शिंदे म्हणाले, "आतापासून..."
हे वाचलं का?
जर विशेष अधिवेशनाचा फायदाच होणार नसेल तर अधिवेशन घेतलंच कशाला ? आम्ही ज्या मागण्या केल्या नव्हत्या, त्या मागण्यांवर अधिवेशन बोलावण्यात आले नाही. सरकारने फसवणूक केली असा आरोप मनोज जरांगे पाटलांनी केला आहे. तसेच सरकारने अधिसूचना काढली मग सरकार अंमलबजावणी का करत नाही, असा सवाल मनोज जरांगे पाटलांनी केला आहे.
मनोज जरांगे पुढे म्हणाले, 'याला फसवणूकच म्हटलं जातं, किती दिवस फसवणूक करणार तुम्ही, तुम्ही अधिसूचना काढली आणि तिची अंमलबजावणी करणार नाही. हे कुठे शक्य आहे. अधिसूचना तुम्हीच काढता आणि अंमलबजावणी तुम्हीच करणार नाही? मग अधिसूचना काढलीच कशाला? हे जर आरक्षण तुम्हाला द्यायचं होतं, मग अधिसूचना काढली कशाला? असे सवाल देखील जरांगेंनी सरकारला केले आहेत.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : पोलीस ठाण्यातच पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या, कारण अस्पष्ट
ADVERTISEMENT
आम्हाला सगे सोयऱ्यांची अंमलबजावणी हवी आहे. त्याचच आम्ही पहिल्यांदा स्वागत केलेले आहे. आमच्या सगे सोयऱ्याची अधिसूचना तुम्ही काढली, त्याची अंमलबजावणी कधी करणार तुम्ही ? अधिवेशन घेतलं कशाला, असा सवाल जरांगेंनी उपस्थित केला.तसेच अधिवेशन हे गोरगरीब जनतेला न्याय मिळाला पाहिजे, करोडोंच्या संख्येने लोक एकत्र आलेली आहेत, त्यासाठी अधिवेशन बोलावल आहे. पण अधिवेशनाचा फायदाच होणार नसेल तर अधिवेशन घेतलचं कशाला? गोरगरीब मराठ्यांच वाटोळ करायला...,अशी टीका देखील जरांगेंनी सरकारवर केली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT