Nawab Malik : अजित पवार गटाने मलिकांना केले दूर; जितेंद्र आव्हाड-रोहित पवार म्हणाले…
Nawab Malik Maharashtra Politics : नवाब मलिकांच्या भूमिकेमुळे अजित पवार गट अडचणीत आला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना पत्र लिहून मलिकांना सोबत घेण्यास विरोध केला. त्यावरून रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाडांनी शेलक्या शब्दात उत्तर दिले आहे.
ADVERTISEMENT

Rohit Pawar Jitendra Awhad on Nawab Malik : नवाब मलिकांच्या भूमिकेमुळे भाजपची अडचण झालीये, तर अजित पवार गटही सावध झाला आहे. नवाब मलिक सत्ताधारी बाकावर जाऊन बसले. त्यामुळे अजित पवारांसोबत असल्याचे स्पष्ट झाले. पण, विरोधकांकडून टीका सुरू होताच अजित पवार गटाने त्यांना दूर केल्याचे दिसत आहे. अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी तसेच संकेत दिले आहेत. पण, यावरून शरद पवारांसोबत असलेले जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवारांनी उरोधिक भाषेत खडेबोल सुनावले. (Rohit Pawar and Jitendra Awhad tweets on Nawab Malik)
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नवाब मलिक सत्ताधारी बाकावर जाऊन बसले. त्यामुळे ते अजित पवार गटासोबत असल्याचे स्पष्ट झाले. पण, यामुळे भाजपवर टीका सुरू झाली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंत्री असताना भाजपनेच मलिकांवर देशद्रोहाचा आरोप केला होता. त्यामुळे आता भाजपची कोंडी झाली. विरोधकांनी भाजपला घेरताच अजित पवार गटाने सावध भूमिका घेत मलिकांना दूर केले.
मलिक अजित पवार गटासोबत नाही?
“आमदार नवाब मलिक हे आमचे अनेक वर्षांपासूनचे ज्येष्ठ सहकारी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत मधल्या कालावधीत घडलेल्या घडामोडींशी त्यांचा कुठलाही संबंध नाही. आजारपणाच्या मुद्द्यावर त्यांना जामीन मिळाल्यानंतर जुने सहकारी म्हणून त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आमची भेट झाली. आम्ही त्यांच्याशी कुठलीही राजकीय चर्चा केलेली नाही. आज विधानसभेत आल्यानंतर जुन्या सहकार्यांशी त्यांचा संवाद आणि भेट होणे स्वाभाविक आहे”, असे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी म्हटले आहे. मलिकांची भेट झाली, पण त्यांच्याशी राजकीय चर्चा केली नाही, असे सांगत तटकरेंनी मलिक अजित पवार गटात नाहीत, अप्रत्यक्षपणे म्हटले आहे.
हेही वाचा >> ‘सत्ता येते आणि जाते, पण…’, फडणवीसांचं अजितदादांना खुलं पत्र, महाराष्ट्रात मोठी खळबळ!
आमदार श्री. @nawabmalikncp हे आमचे अनेक वर्षांपासूनचे ज्येष्ठ सहकारी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत मधल्या कालावधीत घडलेल्या घडामोडींशी त्यांचा कुठलाही संबंध नाही. आजारपणाच्या मुद्द्यावर त्यांना जामीन मिळाल्यानंतर जुने सहकारी म्हणून त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी…
— Sunil Tatkare (@SunilTatkare) December 7, 2023