Jitendra Awhad : "मला वाचवा काका, ही परिस्थिती माझ्यावर आणू नका", आव्हाडांनी अजित पवारांना सांगितला इतिहास
Jitendra Awhad Ajit Pawar : अजित पवारांनी शरद पवारांवर टीका केली होती. त्याला जितेंद्र आव्हाड यांनी उत्तर दिले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

जितेंद्र आव्हाड यांची अजित पवारांवर टीका

अजित पवारांनी काका का? म्हणत केली होती टीका
Jitendra Awhad Ajit Pawar : अजित पवारांनी पक्षाच्या कार्यक्रमात बोलताना काका का? असं म्हणत शरद पवारांना लक्ष्य केलं होतं. जॉर्ज फर्नांडीस आणि स.का. पाटील यांच्या निवडणुकीचा संदर्भ पवारांनी दिला होता. त्यावरून जितेंद्र आव्हाडांनी पलटवार केला. दिलेल्या इतिहासाच्या दाखल्याचा उल्लेख करत आव्हाडांनी तुम्हाला लाज वाटत नाही का? असा सवाल अजित पवारांना केला.
आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात बोलताना जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांनी केलेल्या विधानाचा समाचार घेतला.
आव्हाड म्हणाले, "अजित पवार आपल्या भाषणात म्हणतात... पहिली गोष्ट एकतर त्यांना इतिहासाचा थांगपत्ता नसतो. ते काय बोलतात, त्याचा इतिहासाशी काही संदर्भच नसतो. काल ते म्हणाले की जॉर्ज फर्नांडीस आणि स.का. पाटलांची निवडणूक झाली, तेव्हा जॉर्ज फर्नांडीस म्हणाले की, पापापा... म्हणजे पाटलांना पाडा. पहिली गोष्ट म्हणजे जॉर्ज फर्नांडीस जेव्हा 1971 साली आले, तेव्हा थेट बँगलोरवरून आले होते. तेव्हा स्वच्छ मराठी त्यांना बोलता येत नव्हतं."
इतिहासाचा दाखला, आव्हाडांनी सांगितलं काय होती घोषणा?
आव्हाड पुढे म्हणाले, "त्यातली घोषणा अशी होती की, यू कॅन डिफीट एसके पाटील. तुम्ही स.का. पाटलांचा पराभव करू शकता, ही एक घोषणा होती. पापापा काही नव्हतं. ते लहान बाळासारखं पापापा म्हणाले. नंतर म्हणाले काकाका? काका का? कारण तुम्ही गद्दार निघालात. एक वेळ तुमच्यावर अशी येईल पुढच्या दोन वर्षात की तुम्हाला विचारावं लागेल की, काका का? मला वाचवा काका, ही परिस्थिती माझ्यावर आणू नका."