Shiv Sena: BJP आमदाराने 6 गोळ्या झाडल्या... मृत्यूवर मात करून कल्याणच्या बालेकिल्ल्यात परतले महेश गायकवाड!

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Mahesh Gaikwad : उल्हासनगर (Ulhasnagar) गोळीबार प्रकरणात गंभीर जखमी झालेल्या महेश गायकवाडांना (Mahesh Gaikwad) तब्बल 24 दिवसानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर ६ गोळ्या झाडल्या होत्या. त्यानंतर त्यांच्यावर ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरु होते. आता ते घरी सुखरूप परतले आहेत. (Kalyan Ulhasnagar firing case Shiv sena leader mahesh gaikwad released from hospital after 24 Days)

यावेळी कल्याणच्या दुर्गाडी चौकात महेश गायकवाड यांचे समर्थक आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून त्यांचं जंगी स्वागत करण्या आलं. ‘टायगर इज बॅक’ अशा आशयाचे बॅनर हातात घेत समर्थकांनी एकच जल्लोष केला. तसंच फटाके वाजवत दणक्यात स्वागत केलं. 

महेश गायकवाड यांच्या स्वागतासाठी समर्थकांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. त्यांच्या दीर्घायुष्यासाठी समर्थकांकडून होम हवन, मंत्र जप केले जात आहेत. शहरात जागोजागी बॅनर लावण्यात आले आहेत . तसंच या घटनेनंतर महेश गायकवाड पत्रकार परिषद घेऊन पहिल्यांदाच संवाद साधणार असल्याने ते काय बोलणार याकडे आता सर्वांचच लक्ष लागून आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

महेश गायकवाडांसोबत नेमकं काय घडलं होतं?

भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदेंच्या शिवसेनेच्या स्थानिक नेते महेश गायकवाड यांच्यावर गोळ्या झाडल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या जिल्ह्यात आणि चक्क पोलीस ठाण्यातच ही घटना घडल्याने महाराष्ट्र हादरला. यात महेश गायकवाड गंभीर जखमी झाले होते. 

उल्हासनगरमधील हिल लाईन पोलीस ठाण्यात घडलेली ही घटना जमिनीच्या वादातून झाली असल्याचे पोलिसांनी यावेळी सांगितले. 

ADVERTISEMENT

गोळीबार केल्यानंतर जाहीर कबुली.. गणपत गायकवाडांचे शिंदेंवर गंभीर आरोप 

भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना नेते महेश गायकवाड यांच्यावर  गोळीबार केल्यानंतर जाहीर कबुली देताना म्हटलेलं की, 'पोलीस ठाण्याच्या दरवाज्यात माझ्या मुलाला धक्काबुक्की केली. माझ्या जागेवर या लोकांनी जबरदस्ती कब्जा केला. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रात गुन्हेगारांचं राज्य घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील तर महाराष्ट्रात फक्त गुन्हेगारच पैदा होतील. आमच्या सारख्या साध्या माणसाला एकनाथ शिंदे यांनी आज गुन्हेगार बनवलं आहे.'

ADVERTISEMENT

'मी त्यांना जीवे मारणार नव्हतो. पण माझं आत्मसंरक्षण करण्यासाठी मला हे करणं गरजेचं आहे. एकनाथ शिंदे यांनी असेच गुन्हेगार महाराष्ट्रात पाळून ठेवले आहेत. त्यांनी दुसऱ्याचं आयुष्य खराब करायला घेतलेलं आहे.' ,असे गणपत गायकवाड यांनी शिंदेंवर आरोप केले.

'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे हे कल्याण मतदारसंघाचे खासदार म्हणून सलग दोन वेळा निवडून आले आहेत. सध्या राज्यात भाजप-शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती आहे. मात्र, असं असलं तरीही कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेंविरोधात सर्वपक्षीय विरोधक हे एकवटले आहेत.' असंही ते म्हणाले.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT