Kalyan: काळा तलावावर CM शिंदेंचा इतका जीव का? काय आहे ठाकरे कनेक्शन?
Kalyans Kala Talao interesting Story: कल्याण: कल्याणचा (Kalyan) इतिहास म्हटलं की… सगळ्यात पहिलं वाक्य आपल्या तोंडात येत ते म्हणजे कल्याणच्या सुभेदाराची सून… पण कल्याण काही या एकाच गोष्टीसाठी ओळखला जातो असं नाही. तर याशिवाय कल्याण अनेक ऐतिहासिक गोष्टी लाभल्या आहेत. ज्यामध्ये कल्याणचा काळा तलाव (Kala Talao) ही कल्याणकरांची आजही शान आहे. हाच काळा तलाव ऐतिहासिक […]
ADVERTISEMENT
Kalyans Kala Talao interesting Story: कल्याण: कल्याणचा (Kalyan) इतिहास म्हटलं की… सगळ्यात पहिलं वाक्य आपल्या तोंडात येत ते म्हणजे कल्याणच्या सुभेदाराची सून… पण कल्याण काही या एकाच गोष्टीसाठी ओळखला जातो असं नाही. तर याशिवाय कल्याण अनेक ऐतिहासिक गोष्टी लाभल्या आहेत. ज्यामध्ये कल्याणचा काळा तलाव (Kala Talao) ही कल्याणकरांची आजही शान आहे. हाच काळा तलाव ऐतिहासिक तर आहेच पण त्याला आता राजकीय पार्श्वभूमी देखील आहे. एखाद्या तलावाचं तीन-तीनदा नूतनीकरण का व्हावं आणि त्याच्यावर राजकीय नेत्यांचं एवढं प्रेम का असावं? या सगळ्याचा एक भन्नाट किस्सा आपण जाणून घेऊया. (kalyan why does cm eknath shinde love kala Talao so much what is the thackeray connection)
ADVERTISEMENT
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी नुकतंच काळा तलावाचं ज्याचं नव्याने सुशोभीकरण झालं त्याचं पुन्हा एकदा लोकार्पण केलं. पण याच तलावाबाबत मुख्यमंत्री शिंदे किंवा शिवसैनिकांना एवढा जिव्हाळा का आहे? असा प्रश्न अनेकांना पडला असेल तर त्याचंच उत्तर मी आपल्याला देणार आहे. पण यासाठी आपल्याला थोडंसं मागे म्हणजे भूतकाळात जावं लागणार आहे.
कल्याणचा काळा तलाव हा भाग पूर्वी मुस्लिम बहुल होता. इथेच प्रसिद्ध काळी मशिद आहे. जी शिवकालीन असल्याचं म्हटलं जातं. याच मशिदीच्या नावावरुन येथील तलावाला काळा तलाव हे नाव पडलं. पण या तलावाचं मूळ नाव हे शेनाळे तलाव असं आहे.
हे वाचलं का?
शिंदे-ठाकरे बाळासाहेब ठाकरेंसाठी एकत्र येणार? दिवसही ठरला!
2005 सालापर्यंत हा तलाव अतिशय गलिच्छावस्थेत होता. पण 2005 सालच्या महापालिका निवडणुकीआधी स्वत: बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी कल्याणमध्ये जाहीर सभा घेऊन हा काळा तलाव.. भगवा तलाव झाला पाहिजे असं म्हटलं होतं. याच सभेत बाळासाहेबांनी या तलावाविषयी त्यांच्या मनातील एक आठवणही सांगितलं.
ADVERTISEMENT
बाळासाहेब सभेत म्हणाले की, ‘हा कल्याणचा काळा तलाव अगदी स्वच्छ झाला पाहिजे. तुम्हाला खरं सांगू का.. दादांचं म्हणजे प्रबोधनकारांचा संसार हा विंचवाच्या पाठीवरचं बिऱ्हाड होतं. आम्ही आधी पुण्यात राहायचो. पण त्यानंतर पुणे सोडून आम्ही कल्याणात राहायला आलो. आता तुम्हाला सांगतो.. कल्याणला आम्ही या काळा तलावच्या अगदी समोरच राहायचो. साधारण दोन एक वर्ष आम्ही इथे राहिलो असू. नंतर मग भिंवडीत गेलो आणि मग मुंबईतच स्थायिक झालो.’
ADVERTISEMENT
‘पण जेव्हा आम्ही कल्याण राहत होतो. तेव्हा मी फार छोटा होतो. पण या काळा तलावाच्या आठवणी माझ्या मनात कायम आहेत. मी लहानपणापासून पाहतोय हा तलाव फार काही स्वच्छ नसतो. खरं तर याचं सुशोभिकरण झालं पाहिजे. लोकांना फिरण्यासाठी, बोटिंगसाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. तुम्ही पुन्हा कल्याणची सत्ता शिवसेनेच्या हाती दिली तर हा काळा तलाव मी तुम्हाला भगवा करून दाखेवन.’ असं बाळासाहेब त्या सभेत म्हणाले होते.
साधारण 2005 च्या कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या (KDMC) निवडणुकीत पुन्हा एकदा शिवसेनेची सत्ता आली आणि त्याचनंतर बाळासाहेबांच्या आदेशाप्रमाणे महापालिकेने सर्वात प्रथम या तलावाच्या सुशोभिकरणाचं काम हाती घेतलं. साधारण 2009-10 सालापर्यंत हे काम पूर्ण झालं. ज्याला भगवा तलाव असं नावही देण्यात आलं.
बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक सरकार ताब्यात घेणार? शिंदे-फडणवीस काय म्हणाले?
दरम्यान, बाळासाहेबांच्या निधनानंतर त्यांचं स्मारक व्हावं याबाबत बऱ्याच चर्चा सुरू होत्या. मुंबईतील महापौर निवास त्यासाठी देण्यातही आलं पण त्या सगळ्याच्या आधीच कल्याणच्या काळा तलाव परिसरातच बाळासाहेबांचं भव्य स्मारक उभारण्यात आलं. जिथे बाळासाहेबांचा एक भलामोठा पुतळाही उभारण्यात आलाय. तसेच दोन प्रचंड मोठी आणि अतिशय सुसज्ज दालनंही उभारण्यात आली. जिथे बाळासाहेबांच्या अनेक गोष्टी प्रदर्शनासाठी ठेवण्यात आल्या आहेत. याच स्मारकाचं उद्घाटन हे स्वत: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केलं होतं. कारण बाळासाहेब ठाकरेंचं हे राज्यातील पहिलं स्मारक होतं.
अशातच आता पुन्हा एकदा म्हणजे साधारण तिसऱ्यांदा काळा तलावचं सुशोभीकरण करण्यात आलं आहे. ज्याच्या उद्घाटनासाठी स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कल्याणात आले होते. सध्या शिवसेना कोणाची हा वाद रंगलेला असतानाच. दुसरीकडे बाळासाहेबांच्या आवडीच्या तलावाचा आपल्याला विसर पडलेला नाही हेच तर मुख्यमंत्री शिंदेना दाखवून द्यायचं नाही ना? अशी चर्चा कल्याणकरांमध्ये रंगली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT