सोळाव्या वर्षी आश्रमात भेट, प्रेम, लग्न ते कोर्ट... करूणा मुंडेंनी सांगितलं 'ते' कधीपासून बिघडले
Karuna Munde Interview: राजश्री मुंडेंशी चांगले संबंध आहेत, आम्ही 2019 च्या शपथविधीला सोबत होतो. ते फोटोही माझ्याकडे आहेत, पण टॅब पोलिसांनी जमा करुन घेतलाय. 2019 ला मंत्री झाल्यानंतर सगळं बिघडलं असं करूणा मुंडे म्हणाल्या.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पहिल्यांदा भैय्यू महाराजांच्या आश्रमात भेट
पहिल्यांदा भेटलो तेव्हा धडकले, मी खाली पडले...
तेव्हा मी 9 वी नापास होते, मुंडेंनी कार्ड दिलं
Karuna Munde Interview : "धनंजय मुंडे आणि मी पहिल्यांदा भेटलो तेव्हा चुकून एकमेकांना धडकलो होतो, तिथे मी खाली पडले, अशी आमची फिल्मी सुरूवात" असल्याचं करूणा मुंडे यांनी सांगितलंय.धनंजय मुंडे आणि करूणा मुंडे यांच्यातले वाद हे गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासमोर आहे. दोघांमधील वादाचं हे प्रकरण सध्या न्यायालयात सुरू आहे. सहा दिवसांपूर्वीच न्यायालयाने धनंजय मुंडेंना दणका देत पोटगी देण्याचा निर्णय कायम ठेवला. तसंच दोघांमधले संबंध लग्नासारखेच होते असं न्यायालयाने म्हटलंय. या संपूर्ण प्रकरणानंतर करूणा मुंडेंनी मुंबई तकशी संवाद साधलाय. यावेळी त्यांनी पूर्ण लव्ह स्टोरी सांगितली.
हे ही वाचा >> 'मुलांना जन्म.. करुणासोबत लग्नासारखे संबंध, पोटगी द्यायची!' धनंजय मुंडेंना दणका, कोर्टाचा निकाल जसाच्या तसा..
भैय्यू महाराजांच्या आश्रमात पहिली भेट...
करूणा मुंडे म्हणाल्या, मी इंदोरमध्ये राहत होते. आमचं घर भैय्यू महाराजांच्या आश्रमाजवळ होतं. भैय्यू महाराजांच्या आश्रमातच आम्ही भेटलो. मोदींपासून ते गोपीनाथ मुंडे सगळे तिथे यायचे. मी आश्रमात जात नव्हती, माझा बाबाबुवांवर विश्वास नाही. पण आई जायची म्हणून मी एक दिवस गेले. धनंजय मुंडे आणि माझी टक्कर झाली आणि मी खाली पडले. मी बाहेर गेले, तर ते आले आणि कार्ड देऊन मला म्हणाले नशीब उजळेल, तू फोन कर या नंबरवर... मी कार्ड फाडून फेकलं आणि उलट उत्तर दिलं. नंतर आमच्यात अनेक अडचणी आल्या. पण नंतर प्रेम झालं आणि 1998 मध्ये आमचं लग्न झालं.
1998 ला लग्न, 1999 पासून मुंबईत...
करूणा मुंडे यांनी सांगितलं की, इंदोरमध्ये वैदिक पद्धतीनं आमचं लग्न झालं. 1999 मध्ये मुंबईमध्ये आलो. आम्ही भेटलो तेव्हा मी फक्त 16 वर्षांची 9 वी फैल मुलगी होते. ते मला म्हणाले मी वकील होणार आहे, तू कशी सुशिक्षित नवऱ्याची अशिक्षित पत्नी वाटशील. तर तू पण शिकून घे. मी लग्नानंतरही इंदोरमध्ये राहिले होते, आठवड्यातून दोन दिवस मी यायचे, तर कधी ते इंदोरला यायचे.
धनंजय मुंडेंनी माझ्या बहिणीसोबत...
मी त्यांच्या प्रेमात पडून दहावी, बारावी, फर्स्ट इयरचं शिक्षण घेतलं. नंतर मुंबईत आम्ही 2003 मध्ये घर घेतलं आणि राहिले. 6 एप्रिल 2005 ला आम्हाला मुलगा झाला, त्या दिवशी भाजप स्थापना दिवस असतो. धनंजय मुंडेही तेव्हा भाजपमध्येच होते. धनंजय मुंडेंनी बहिणीबरोबर काही गोष्टी केल्या आणि मी विष प्राशन केलं. तेव्हा आईने आत्महत्या केली असा आरोप दावा करूणा मुंडेंनी केला.










