Ladki Bahin Yojna : निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर लाडकी बहीण योजना तूर्तास बंद

मुंबई तक

ADVERTISEMENT

ladki bahin yojana mahayuti govermement election commission order mukhymantri majhi ladki bahin yojana scheme aditi tatkare eknath shinde ajit pawar
'लाडकी बहीण' योजनेत मोठी अपडेट
social share
google news

बातम्या हायलाइट

point

लाडकी बहीण योजनेचा निधी थांबवला

point

अर्ज प्रक्रियाही झाली बंद

point

लाडकी बहीण योजनेत मोठी अपडेट

Mukhymantri Majhi Ladki Bahin Yojana Scheme : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील महिलांसाठी मोठी बातमी समोर आली आहे.आतापर्यंत या योजनेत 2 कोटी 20 लाख महिलांनी लाभ घेतला होता. या महिलांच्या खात्यात आतापर्यंत 5 महिन्यांचे 7500 रूपये जमा झाले आहेत. यानंतर आता महिलांना पुढच्या हप्त्याची म्हणजेच डिसेंबरमध्ये हाती येणार निधीची उत्सुकता लागली आहे. पण राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा निधी थांबवला आहे. तसेच नवे अर्ज स्विकारणेही बंद केले आहे. नेमकं सरकारने असं का केलंय हे जाणून घेऊयात.( ladki bahin yojana mahayuti govermement election commission order mukhymantri majhi ladki bahin yojana scheme aditi tatkare eknath shinde ajit pawar) 

ADVERTISEMENT

महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी एका टप्प्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यानंतर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने आचारसंहितेच्या काळात मतदारांवर थेट प्रभाव टाकणाऱ्या आर्थिक योजना बंद कराव्यात अशा सूचना निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिल्या आहेत. त्यानुसार महिला व बालकल्याण विभागाकडून या योजनेसाठी लागणारा निधी थांबवला आहे. परिणामी निवडणुका होईपर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे पात्र महिलांना मिळणार नाही.लोकसत्ताने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

हे ही वाचा : Shiv Sena : CM शिंदेंच्या 10 आमदारांचा पत्ता होणार कट? कोणत्या आमदारांची नावं?

राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी सरकारच्या सर्व विभागांकडे आर्थिक लाभ देऊन मतदारांवर थेट प्रभाव टाकणाऱ्या योजनांची माहिती विचारली होती. त्यात महिला व बालकल्याण विभागाकडून लाडकी बहीण योजनेंतर्गत मोठा आर्थिक लाभ दिला जात असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार आयोगाने या विभागाकडून यासंबंधीची योग्य ती माहिती मागवली होती. त्यात विभागाने या योजनेला केला जाणारा निधीचा पतपुरवठा 4 दिवसांपूर्वीच थांबवण्यात आल्याची माहिती देण्यात आली होती. याचा अर्थ निवडणूक आचारसंहितेमुळे ही योजना तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.

हे वाचलं का?

त्यामुळे आता निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा निधी थांबवला आहे. तसेच नवे अर्ज स्विकारणेही बंद केले आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेला तूर्त ब्रेक लागला  आहे.

हे ही वाचा : ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो! दिवाळी बोनस नक्की मिळणार का? सरकारने दिली मोठी अपडेट

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT