Ladki Bahin Yojana : 'मुख्यमंत्री' शब्द वगळला! लाडक्या बहिणींवरून महायुतीतल्या भावांचे एकमेकांना चिमटे, मंत्रिमंडळ बैठकीत काय घडलं?

मुस्तफा शेख

ADVERTISEMENT

ladki bahin yojana shinde group objected to ncp ajit pawar group word chief minister cabinet meeting mukhyamantri ladki bahin yojana scheme
लाडक्या बहिणींवरून महायुतीत श्रेयवादाची लढाई
social share
google news

बातम्या हायलाइट

point

लाडकी बहीण योजनेवरून महायुतीत श्रेयवादाची लढाई

point

'मुख्यमंत्री' शब्द वगळून लाडकी बहीण योजनेचा प्रचार

point

शिंदे गटानेे घेतला आक्षेप

Cabinet meeting : लाडकी बहीण योजनेवरून महायुतीत श्रेयवादाची लढाई सूरू झाली आहे. अजित पवारांच्या अनेक कार्यक्रमात 'मुख्यमंत्री' शब्द वगळून लाडकी बहीण योजनेचा प्रचार सूरू आहे. हीच घटना शिंदेंच्या नेत्यांना खुपली आहे. त्यामुळे या घटनेचे पडसाद आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाहायला मिळाले. यावेळी मुख्यमंत्री शिंदेंनी 'मुख्यमंत्री हा शब्द वापरला जात नाही? असा सवाल धनंजय मुंडेंना विचारला होता.  यावर मुंडेंनी फोटो आणि नाव वापरण्यात आल्याचे स्पष्ट केल्याची माहिती सुत्रांकडून मिळतेय.  (ladki bahin yojana shinde group objected to ncp ajit pawar group word chief minister cabinet meeting mukhyamantri ladki bahin yojana scheme)

राजकीय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळ बैठक संपल्यानंतर मंत्र्यांमध्ये सुरू असलेल्या हसत खेळत चर्चेत, मंत्री शंभूराज देसाई यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची प्रसिद्धी करताना 'मुख्यमंत्री' हा शब्द वापरला जात नसल्याचं मुख्यमंत्र्यांना सांगितलं. यावर मुख्यमंत्र्यांनी देखील हसत खेळत धनंजय मुंडे यांना याचा जाब विचारला. यावर धनंजय मुंडे यांनी असं काही नसून बीडच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या नावांचा उल्लेख तसेच फोटो आणि योजनेचे नाव देखील योग्यरीत्या वापरण्यात आल्याच स्पष्ट केलं. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपण लवकरच या योजनेच्या अनुषंगाने एक एसओपी आणूयात अशी भुमिका मांडली, अशी सुत्रांकडून माहिती मिळतेय. 

हे ही वाचा : Gadchiroli Video : काळजावर वार... दोन्ही मुलांचा एकाच वेळी मृत्यू, आई-वडिलांची मृतदेह खांद्यावर घेतला अन 15 किमी...

अजित पवार गटाने आयोजित केलेल्या विविध कार्यक्रम आणि जनसन्मान यात्रेत लाडकी बहीण योजनेची जोरदार प्रसिद्धी करुन अर्थमंत्री म्हणून या योजनेचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र योजनेचे नाव ‘ मुख्यमंत्री लाडकी बहीण ’ असे असताना त्यांच्या जाहिरात फलक व अन्य तपशीलातून मुख्यमंत्री शब्द वगळण्यात आला आहे. त्यामुळे शिंदे गटातील नेते चिडले होते.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा :  Shivaji Maharaj Statue: ''जो चूक करतो, तोच माफी मागतो'', पुतळा दुर्घटनेवरून राहुल गांधी PM मोदींवर भडकले

''प्रत्येकवेळी महायुतीत कोणतेही खटके उडू नयेत म्हणून आम्ही या भूमिकेत असतो. परतू पुन्हा पुन्हा तेच होत असेल, एखाद्या बॅनरवर लाईन आली तर समजू शकतो. पण जाणून बुजून मुख्यमंत्री हा शब्द नसावा हा अट्टाहास कशाला हवा. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हे आपल्या सरकारचं यश आहे. सर्वजण मिळून करत आहोत पण मग एकच वादा, दादा का वादा हे का. पक्षाच्या कार्यक्रमात या घोषणा चालतात. आम्ही शिंदे साहेबांचा घोष करु. कोणी देवेंद्र फडणवीस यांचे करतील. याला आमचा विरोध नाही. पण एखादी योजना आम्ही आणली असं सांगणं इतरांना दुखावण्याचा प्रकार आहे. मी वारंवार सांगतोय. की आम्हाला महायुतीत कोणीही श्रेय घेण्याचा प्रयत्न करु नये''अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे नेते संजय शिरसाठ यांनी टीव्ही 9 सोबत बोलताना दिली आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT