Lal Krishna Advani यांना भारतरत्न जाहीर, PM मोदींनी स्वत: केली घोषणा

रोहित गोळे

ADVERTISEMENT

lal krishna advani will get the highest civilian honor bharat ratna pm narendra modi announced
lal krishna advani will get the highest civilian honor bharat ratna pm narendra modi announced
social share
google news

Lal Krishna Advani: नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाचे (BJP) ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी (Lal Krishna Advani) यांना देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्नने सन्मानित करण्यात येणार आहे. याबाबतची घोषणा स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. काही दिवसांपूर्वीच बिहारचे दिवंगत मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर आज (3 फेब्रुवारी) अडवाणींना भारतरत्न जाहीर करण्यात आला. (lal krishna advani will get the highest civilian honor bharat ratna pm narendra modi announced)

ADVERTISEMENT

खुद्द पंतप्रधान मोदींनी माहिती दिली

पीएम मोदींनी लिहिले की, ‘मला कळवताना अतिशय आनंद होत आहे की लालकृष्ण अडवाणीजी यांना भारतरत्नने सन्मानित करण्यात येणार आहे. मी त्यांच्याशीही बोललो आणि हा सन्मान मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. आपल्या काळातील सर्वात प्रतिष्ठित राजकारण्यांपैकी एक, अडवाणीजी यांनी भारताच्या विकासात अविस्मरणीय योगदान दिले आहे. तळागाळात काम करण्यापासून ते उपपंतप्रधान म्हणून देशाची सेवा केली. त्यांनी गृहमंत्री आणि माहिती व प्रसारण मंत्री म्हणूनही आपला ठसा उमटवला होता. त्यांचे संसदीय कार्य नेहमीच अनुकरणीय आणि समृद्ध अंतर्दृष्टीने भरलेले आहे.’

पीएम मोदींनी पुढे लिहिलं की, ‘अडवाणी जी यांची सार्वजनिक जीवनातील दशके चाललेली सेवा पारदर्शकता आणि सचोटीसाठी त्यांच्या अटल वचनबद्धतेसाठी ओळखली जाते. ज्याने राजकीय नैतिकतेमध्ये एक अनुकरणीय मानक स्थापित केले. त्यांनी राष्ट्रीय एकात्मता आणि सांस्कृतिक पुनरुज्जीवनासाठी खूप प्रयत्न केले आहेत. त्यांना भारतरत्नने सन्मानित करणे हा माझ्यासाठी खूप भावनिक क्षण आहे. त्यांच्याशी संवाद साधण्याच्या आणि त्यांच्याकडून शिकण्याच्या अगणित संधी मिळाल्या हे मी नेहमीच माझे भाग्य समजतो.’

हे वाचलं का?

तीन वेळा पक्षाध्यक्ष

1980 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या स्थापनेपासून सर्वात जास्त काळ पक्षाचे अध्यक्ष राहिलेले लालकृष्ण अडवाणी हे एकमेव नेते आहेत. पहिल्यांदा ते 1986 ते 1990 आणि नंतर 1993 पर्यंत अध्यक्ष होते. 1998 आणि त्यानंतर ते 2004 ते 2005 पर्यंत पक्षाचे अध्यक्ष राहिले. खासदार म्हणून 3 दशकांची प्रदीर्घ इनिंग खेळल्यानंतर अडवाणी आधी गृहमंत्री बनले आणि नंतर अटलजींच्या मंत्रिमंडळात (1999-2004) उपपंतप्रधान बनले.

पाकिस्तान मध्ये जन्म

अडवाणी यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1927 रोजी सिंध प्रांतात (पाकिस्तान) झाला. त्यांनी सेंट पॅट्रिक्स स्कूल, कराची येथे शिक्षण घेतले आणि सुरुवातीपासूनच त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे जाण्याची प्रेरणा होती. अडवाणींना 1947 मध्ये देशाच्या स्वातंत्र्याचा उत्सवही साजरा करता आला नव्हता. कारण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही तासांतच त्यांना आपले घर सोडून स्वतंत्र भारतात यावं लागलं होतं.

ADVERTISEMENT

मात्र, त्यांनी या घटनेचा स्वत:वर परिणाम होऊ दिला नाही आणि या देशाला एकसंध करण्याचा संकल्प मनात ठेवून ते राजस्थानमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून कार्यरत राहिले. 1957 मध्ये अडवाणींना राजस्थान सोडून दिल्लीत येण्यास सांगण्यात आले जेणेकरून ते अटल आणि नवनिर्वाचित खासदारांना मदत करू शकतील. दिल्लीतील एका कार्यालयात सुमारे 3 वर्षे काम केल्यानंतर, अडवाणींनी पत्रकार म्हणून त्यांच्या आयुष्याचा एक नवीन अध्याय सुरू केला आणि 1960 मध्ये त्यांनी ‘ऑर्गनायझर’मध्ये सहाय्यक संपादक म्हणून पदभार स्वीकारला.

ADVERTISEMENT

1980 ते 1990 या काळात अडवाणींनी आपला सगळा वेळ भाजपला राष्ट्रीय पातळीवरचा पक्ष बनवण्यात वाहून घेतला आणि त्याचा परिणाम तेव्हा दिसून आला जेव्हा 1984 मध्ये केवळ 2 जागा जिंकणाऱ्या पक्षाला लोकसभा निवडणुकीत 86 जागा मिळाल्या, हा एक विक्रम होता. त्यावेळी ती खूपच चांगली कामगिरी होती. पक्षाची स्थिती 1992 मध्ये 121 आणि 1996 मध्ये 161 खासदारांपर्यंत पोहोचली. त्यावेळी स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच काँग्रेस सत्तेतून बाहेर पडली आणि भाजप सर्वाधिक संख्याबळ असलेला पक्ष म्हणून पुढे आला होता.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT