Sangram Thopte : “अजित पवारांचा होता विरोध, आता विरोधी पक्षनेता करा”, खरगेंना पत्र

मुंबई तक

ADVERTISEMENT

Sangram Thopte letter to Mallikarjun Kharge After the recent political developments in Maharashtra, the post of Leader of Opposition.
Sangram Thopte letter to Mallikarjun Kharge After the recent political developments in Maharashtra, the post of Leader of Opposition.
social share
google news

Maharashtra Politics : अजित पवारांनी बंड केलं आणि शिंदेंच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले. त्यामुळे विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाची जागा रिक्त झालीये. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याने आता काँग्रेस विधानसभेत सर्वात मोठा पक्ष बनला आहे. त्यामुळे काँग्रेसकडून विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला जात असून, पुणे जिल्ह्यातील भोर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संग्राम थोपटे यांनी थेट काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांना पत्र पाठवलं आहे. ‘मला विरोधी पक्षनेता करा’, अशी मागणी करताना थोपटेंनी अजित पवारांवर गंभीर आरोप केला आहे. (Congress MLA Sangram Thopte has written a letter to Congress President Mallikarjun Kharge and requested him to consider his name for the Leader of the Opposition)

शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झाल्याने पक्षातील आमदारांची संख्या घटली आहे. अजित पवारांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांची संख्या जास्त असून, ते आता सत्ताधारी बाकांवर बसणार आहे. त्यामुळे विरोधी बाकावर काँग्रेसचे सर्वाधिक आमदार आहेत. काँग्रेसमधील काही नेते विरोधी पक्षनेते पदावर दावा करत आहेत, अशातच आमदार संग्राम थोपटे यांनी मल्लिकार्जून खरगे यांना पत्र पाठवलं आहे.

संग्राम थोपटेंनी पत्रात काय म्हटलंय?

पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर थोपटे यांनी खरगेंना पत्र लिहिलं आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले असताना थोपटेंनी थेट राष्ट्रीय अध्यक्षांना पत्र पाठवलं आहे. विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेसमधून ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांच्या नावांची चर्चा असतानाच थोपटेंनी या पदावर दावा केला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

अजित पवारांनी केला होता विरोध

मल्लिकार्जून खरगे यांना लिहिलेल्या पक्षात संग्राम थोपटे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळातील एक घटना सांगितली आहे. थोपटे यांनी म्हटलं आहे की, मविआ सरकार असताना विधानसभा अध्यक्षपदासाठी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं होतं, पण अजित पवारांनी त्याला विरोध केला. अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांसोबत संगनमत केल्याचंही त्यांनी म्हटलंय.

विरोधी पक्षनेता पद मलाच का? थोपटेंनी काय दिली कारणं?

संग्राम थोपटे पत्रात म्हणतात, “आता अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाहीत. पश्चिम महाराष्ट्र, पुणे जिल्ह्यातील राजकारण लक्षात घेऊन या संधीचा फायदा घेऊ शकतो. पुणे जिल्ह्यात आणि पश्चिम महाराष्ट्रातील स्थिती सुधारण्यासाठी काँग्रेस पक्षाला मजबूत करून प्रबळ विरोधी पक्ष म्हणून उभं करू शकतो.”

ADVERTISEMENT

वाचा >> Maharashtra Politics: शिंदे-अजित पवारांवर मतदार प्रचंड नाराज?, सर्व्हेतून धक्कादायक खुलासे

“चार महिन्यांपूर्वी पुण्यातील कसबा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. त्यावेळी मी मुख्य निरीक्षक होतो. मी मतदारांशी पक्षाला जोडण्याचं काम केलं. काँग्रेसच्या उमेदवार जिंकून येईल, यासाठी काम केले”, असंही थोपटे यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

वाचा >> Mumbai Bandstand : ‘मुलगी ओरडत राहिली, लाट आली अन्…’, फोटोच्या नादात गेला जीव

पुढे थोपटे यांनी म्हटलं आहे की, “कर्नाटक विधानसभा निवडणुकीतही माझ्यावर निरीक्षक म्हणून जबाबदारी होती. काँग्रेसला जर भाजपसोबत लढायचं असेल आणि पुणे, पश्चिम महाराष्ट्रातील मुद्दे सोडावायचे असतील, तर माझा अनुभव उपयोगी ठरू शकतो”, असं सांगत थोपटेंनी विरोधी पक्षनेते पदी निवड करण्याची मागणी केली आहे.

विधानसभेत कुणाच्या किती जागा?

महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण जागा आहेत 288. त्यापैकी 105 जागा भाजपच्या आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे 40 आमदार आहेत. तसेच अपक्ष आणि इतर असे 20 जणही सत्ताधारी बाकावर आहेत. अजित पवार गटाकडे सध्या 35 आमदार आहेत. सत्ताधाऱ्यांकडे प्रचंड बहुमत आहे. सध्या शिवसेनेकडे (युबीटी) 15 जागा आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसकडे 14 तर काँग्रेसच्या आमदारांची संख्या आहे 44. त्यामुळे विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेसचं पारडं जड आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT