Lok Sabha 2024 : महायुतीत शिवसेनेला झुकतं माप, अजित पवार गटाला 4 जागा?

मुंबई तक

ADVERTISEMENT

लोकसभा निवडणुकीत भाजप सर्वाधिक जागा लढवण्याची शक्यता आहे.
Mahayuti seat allocation for the lok sabha elections
social share
google news

Lok Sabha 2024 election Maha Yuti Seat Sharing : लोकसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांची चर्चा सुरू आहे. महायुतीची भाजप सर्वाधिक जागा लढवणार असल्याचे बोललं जात आहे. त्यातच महायुतीचा फॉर्म्युला समोर आला असून, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला तडजोड करावी लागत असल्याचे दिसत आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीत ३२-१२-४ असा फॉर्म्युल्यानुसार जागावाटप होईल असा अंदाज आहे. राज्यात 48 जागा आहेत. त्यापैकी सर्वाधिक 32 जागा भाजप लढणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 12 जागा दिल्या जाऊ शकतात. 

अजित पवारांना करावी लागणार तडजोड?

महायुतीतील जागा वाटपाच्या ज्या फॉर्म्युल्याची चर्चा सुरू आहे, त्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला जास्त त्याग करावा लागत असल्याचे दिसत आहे. राज्यातील काही लोकसभा मतदारसंघात अजित पवार समर्थक निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. मात्र, 4 जागा मिळाल्या तर नाराजी उफाळून येऊ शकते. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

अजित पवार गटाला किती हव्यात जागा?

दरम्यान, महायुतीच्या जागावाटपाच्या फॉर्म्युल्याबद्दल अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना प्रश्न विचारण्यात आला. ते म्हणाले की, "मला काहीच माहिती नाही. माझं एवढंच म्हणणं आहे की, शिंदे गटाला जेवढ्या जागा मिळतील, तेवढ्याच जागा अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाल्या पाहिजेत एवढंच माझं म्हणणं आहे."

४५ पेक्षा जास्त जागा जिंकण्याचे लक्ष

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात 45 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचे भाजपचे लक्ष आहे. अलिकडेच समोर आलेल्या ओपिनियन पोलमध्ये महायुतीला अपेक्षित यश मिळताना दिसत नाही. अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा फायदा म्हणावा तितका फायदा महायुतीला होताना दिसत नाहीये. त्यामुळे महाराष्ट्रात जास्तीत जास्त जागा लढवण्याचे भाजपचे प्रयत्न आहेत. यासाठी शिंदेंच्या शिवसेनेतील आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील उमेदवारांची अदलाबदलही केली जाऊ शकते. तसे संकेत देवेंद्र फडणवीस यांनीच दिले आहेत. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT