Lok Sabha : भाजपचं मिशन-80 काय?; खासदारांना फॉर्ममधून द्यावा लागणार हिशोब
भाजपने लोकसभा निवडणुकीच्या तयारीला वेग दिला आहे. लोकसभेत सर्वाधिक खासदार उत्तर प्रदेशातून जातात, त्यामुळे पुन्हा सत्तेत राहायचं असेल, भाजपसाठी युपी महत्त्वाची आहे. त्यामुळेच भाजपने मिशन 80 वर काम सुरू केले आहे.
ADVERTISEMENT

Bjp mission 80 for UP : दिल्लीतील सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेशातून जातो असं नेहमी म्हटलं जातं. त्याच कारण म्हणजे उत्तर प्रदेशात असलेल्या खासदारांची सर्वाधिक संख्या. भाजपने लोकसभा निवडणुकीच्या तयारीला वेग दिला आहे. लोकसभेत सर्वाधिक खासदार उत्तर प्रदेशातून जातात, त्यामुळे पुन्हा सत्तेत राहायचं असेल, भाजपसाठी युपी महत्त्वाची आहे. त्यामुळेच भाजपने मिशन 80 वर काम सुरू केले आहे. या संदर्भात भाजपने उत्तर प्रदेशातील खासदारांकडून परफॉर्मन्स रिपोर्ट कार्ड मागवले असून, त्यासाठी त्यांना एक फॉर्मही पाठवण्यात आला आहे. या फॉर्ममध्ये सर्व खासदारांकडून जनसंपर्क अभियानाचा अहवाल मागवण्यात आला असून, किती कुटुंबापर्यंत पोहोचला आहात?, अशी विचारणा करण्यात आली आहे.
भाजपने सर्व खासदारांना दोन पानांच्या सुचनेसह तीन फॉर्म पाठवले आहेत. हे फॉर्म भरल्यानंतर त्यांना तो राज्याच्या प्रदेश कार्यालयात किंवा दिल्लीतील संसदीय कार्यालयात जमा करावा लागणार आहे. यामध्ये खासदारांनी जनसंपर्क अभियानात किती काम केले? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला आहे. यासोबतच पुढील उद्दिष्टेही देण्यात आली आहेत. खासदारांकडून दिला जाणारा हा अहवाल त्याच्या 2024 च्या तिकीट देण्यात महत्वाचा असणार आहे.
खासदारांना द्यायची आहे ही माहिती
मिळालेल्या माहितीनुसार, खासदारांना सोशल मीडियावर प्रभाव असणाऱ्या म्हणजे 100-100 सोशल मीडिया इनफ्लून्सरची यादी पाठवायची आहे. तसेच त्यांचे मेळावे आयोजित करावे लागणार आहेत. यात किती सोशल मीडियावर प्रभावी असणारे भाजपसाठी चांगले लिहितात, किती नकारात्मक लिहितात आणि किती लोक तटस्थ आहेत, हेही खासदारांना सांगावे लागणार आहेत.
– खासदारांना त्यांच्या लोकसभा मतदारसंघातील 1000 प्रतिष्ठित लोकांची यादी द्यावी लागणार आहे. यामध्ये पद्म पुरस्कार विजेते, खेळाडू, शिक्षक, डॉक्टर, शहिदांचे कुटुंबीय यांचा समावेश आहे. यासोबतच त्यांना त्यांच्या परिसरातील 40 ते 50 कार्यकर्त्यांची टीम तयार करायची आहे.