महाराष्ट्रात BJP चा सेफ गेम! बड्या नेत्यांना उमेदवारी देऊन कसा साधणार डाव?

रोहिणी ठोंबरे

BJP candidate list : भाजपने (BJP) जाहीर केलेल्या उमेदवारांच्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील (Maharashtra) 20 जागांचाही समावेश आहे. बुधवारी (13 मार्च) जाहीर झालेल्या यादीत पक्षाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पियुष गोयल, माजी राज्यमंत्री पंकजा मुंडे यांच्या नावांची घोषणा केली आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

BJP candidate list : भाजपने (BJP) जाहीर केलेल्या उमेदवारांच्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील (Maharashtra) 20 जागांचाही समावेश आहे. बुधवारी (13 मार्च) जाहीर झालेल्या यादीत पक्षाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पियुष गोयल, माजी राज्यमंत्री पंकजा मुंडे यांच्या नावांची घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 पैकी 20 जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर करत भाजपने पुन्हा एकदा नितीन गडकरी यांना नागपूर मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. राज्यात भाजपने सेफ गेम खेळला आहे असं म्हटलं जात आहे.

केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांना मुंबई उत्तरमधून तर पंकजा मुंडे यांना बीडमधून उमेदवारी देण्यात आली आहे. या दोघांसह भाजपने या यादीत एकूण 8 नवीन चेहऱ्यांचा समावेश केला आहे. पंकजा यांना त्यांची धाकटी बहीण आणि विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांच्या जागी तिकीट देण्यात आले आहे. पक्षाने 2019 मध्ये जिंकलेल्या जागांपैकी आणखी तीन जागांसाठी उमेदवारांची नावे अद्याप जाहीर केलेली नाहीत. उत्तर मध्यमधून पूनम महाजन यांचे नाव अद्याप निश्चित झालेले नाही. तर भंडारा, गोंदिया आणि सोलापूरच्या जागा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत.

भाजपच्या पहिल्या यादीत गडकरींचे नाव नव्हते, त्यानंतर शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना विरोधी उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याची खुली ऑफर दिली होती. मात्र भाजपने दुसऱ्या यादीत गडकरींचे नाव जाहीर केले आहे.

या यादीतील आणखी एक नवा चेहरा म्हणजे राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार चंद्रपूरमधून निवडणूक लढवतील. याशिवाय महाराष्ट्रातील सर्व केंद्रीय मंत्र्यांना पुन्हा तिकीट देण्यात आले आहे. जळगावचे लोकसभा सदस्य उन्मेष पाटील यांच्या जागी पक्षाने स्थानिक नेत्या स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली आहे. या यादीत अनुप धोत्रे यांनी त्यांचे वडील आणि अकोल्याचे विद्यमान खासदार संजय धोत्रे यांची जागा घेतली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp