Lok Sabha 2024 election : ठाकरेंना मुंबईतील’या’ दोन जागा सोडाव्या लागणार?

ऋत्विक भालेकर

ADVERTISEMENT

In MVA meet, around half a dozen seats have created a deadlock in Maha Vikas Aghadi (MVA) for the seat sharing of Lok Sabha elections
In MVA meet, around half a dozen seats have created a deadlock in Maha Vikas Aghadi (MVA) for the seat sharing of Lok Sabha elections
social share
google news

Maha Vikas Aghadi Lok Sabha Seat Sharing : महाविकास आघाडीतील लोकसभेच्या जागावाटपाचा तिढा दिल्लीत गेल्यानंतरच सुटेल, असेच दिसत आहे. कारण मुंबईत झालेल्या बैठकीत जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. मुंबईतील दोन मतदारसंघासाठी काँग्रेस आग्रही आहे. या दोन्ही मतदारसंघात 2019 मध्ये शिवसेनेचे उमेदवार निवडून आले होते. त्यामुळे आता ठाकरे हे मतदारसंघ सोडणार का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघापैकी कोणते मतदारसंघ कोणत्या पक्षाकडे जाणार याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. यासंदर्भात महायुतीत पडद्याआड खलबतं सुरू आहेत. तर महाविकास आघाडीच्याही बैठका सुरू आहेत.

महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या प्रमुख पक्षांच्या नेत्यांच्या बैठका सुरू आहेत. मुंबईत 30 जानेवारी रोजी मविआच्या नेत्यांची बैठक झाली, पण काही जागांवरून कोणताही निर्णय झाला नाही.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

काँग्रेसला हव्यात मुंबईतील दोन जागा

महाविकास आघाडीचं बहुतांश जागांवर एकमत झालं असलं, तरी काही लोकसभा मतदारसंघासाठी तिन्ही पक्ष आग्रही आहेत. यात मुंबईतील दोन लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे.

मुंबईत एकूण 6 लोकसभा मतदारसंघ आहेत. यात समसमान वाटप करण्यासाठी काँग्रेस आग्रही असल्याचे सूत्रांनी सांगितलं. महत्त्वाचं म्हणजे ज्या लोकसभा मतदारसंघातून 2019 मध्ये शिवसेनेचे उमेदवार निवडून आले, तेच मतदारसंघ काँग्रेसला हवे आहेत.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> शिंदे गटाचा ठाकरे गटावर गंभीर आरोप; थेट पोलिसात तक्रार; नेमकं प्रकरण काय?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई या दोन मतदारसंघाची मागणी काँग्रेसकडून बैठकीत करण्यात आली. दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघ आमदार वर्षा गायकवाड यांच्यासाठी, तर उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून काँग्रेसचे संजय निरूपम हे इच्छुक आहेत.

ADVERTISEMENT

दोन्ही खासदार शिंदेंच्या गटात

2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण मध्य मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबई या दोन्ही मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार निवडून आले होते. त्यामुळे या मतदारसंघावर शिवसेनेकडून (उद्धव बाळासाहेब ठाकरे) केला जात आहे.

मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातून राहुल शेवाळे निवडून आले होते. राहुल शेवाळे यांनी काँग्रेसचे उमेदवार आणि आमदार वर्षा गायकवाड याचे वडील एकनाथ गायकवाड यांचा पराभव केला होता. राहुल शेवाळे 2014 मध्येही या मतदारसंघातून निवडून आले होते. त्यापूर्वी 2009 मध्ये एकनाथ गायकवाड हे या लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते.

हेही वाचा >> ‘मविआ’ने तो निर्णय घेतला! प्रकाश आंबेडकरांना दिलं पत्र

दुसऱ्या जो लोकसभा मतदारसंघ काँग्रेस हवा आहे, तो मतदारसंघही 2014 पासून शिवसेनेकडे आहे. 2009 मध्ये काँग्रेसचे गुरूदास कामत या मतदारसंघाचे खासदार होते. त्यानंतर गजानन कीर्तिकर हे 2014 आणि 2019 असे सलग दोन वेळा निवडून आले आहेत.

दिल्लीतच होणार अंतिम निर्णय

महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेतृत्व या दोन जागांवर दावा करत आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरेंची शिवसेना या मतदारसंघावरून दावा सोडायला तयार नाहीये. त्यामुळेच हा तिढा कायम आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईतील या मतदारसंघाचा पेच राज्यात सुटला नाही, तर काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठीसोबत चर्चा करून मार्ग काढला जाईल आणि नंतर जागावाटप निश्चित होईल.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT