Shiv Sena UBT: 'असुरांचा संहार कराया, मशाल हाती दे...', ठाकरेंच्या शिवसेनेचं नवं गाणं ऐकलं का?

मुंबई तक

Shiv Sena UBT New Song: विधानसभा निवडणुकीआधी आणि नवरात्रीच्या मुहूर्तावर ठाकरेंच्या शिवसेनेने एक नवं गाणं लाँच केलं असून त्यातून विरोधकांवर निशाणा साधला आहे.

ADVERTISEMENT

ठाकरेंच्या शिवसेनेचं नवं गाणं ऐकलं का?
ठाकरेंच्या शिवसेनेचं नवं गाणं ऐकलं का?
social share
google news

Shiv Sena New Song: मुंबई: नवरात्रीच्या मुहूर्तावर ठाकरेंच्या शिवसेनेने एक नवं गाणं आज (3 ऑक्टोबर) लाँच केलं आहे. नवरात्रीची आजपासून सुरुवात होत असल्याने पहिल्याच दिवशी ठाकरेंनी 'मशाल गीत' लाँच केलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने ठाकरे गटाने हे गीत लाँच केलं असून त्या माध्यमातून विरोधकांवर निशाणा साधला आहे. (maharashtra assembly elections shiv sena ubt has launched a new song and targeting the opposition)

'असुरांचा संहार कराया मशाल हाती दे..., सत्वर भूवरी ये गं अंबे सत्वर भूवरी ये...' असे या गाण्याचे शब्द आहेत. हे गाणं राज्यातील अराजकतेवर अराजकीय असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. 

गाणं लाँच केल्यावर उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले? 

'एक गोष्ट लक्षात आली असेल की, गेली दोन-अडीच वर्ष आम्ही न्यायालयाची दारं ठोठावत आहोत. हात दुखायला लागले. न्यायदेवतेवर विश्वास आहे पण अजूनही न्याय मिळत नाहीए.'

'मग आम्ही असं ठरवलं की, शेवटी जगदंबेलाच साकडं घातलं पाहिजे.. आता तू तरी दार उघड बये.. आम्ही आता जनतेच्या न्यायालयात न्याय मागण्यासाठी जात आहोत. मला आत्मविश्वास आहे की, ही सगळी तोतयेगिरी चालली आहे. घटनाबाह्य सरकार वारेमाप भ्रष्टाचार करतंय, महिलांवर अत्याचार होत आहेत.'

हे वाचलं का?

    follow whatsapp