“शिवतीर्थावर अर्धवटरावांनी…”, उद्धव ठाकरेंच्या टीकेला भाजपचं प्रत्युत्तर

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

Maharashtra Politics, Dasara Melava 2023 : शिवाजी पार्क मैदानात झालेल्या दसरा मेळाव्यात बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले. घराणेशाही, भ्रष्टाचारावरून ठाकरेंनी उलटसवाल केला. ठाकरेंच्या टीकेला भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आलं. उद्धव ठाकरेंचा अर्धवटराव असा उल्लेख करत खिल्लीही उडवली आहे.

ADVERTISEMENT

ठाकरेंच्या शिवसेनेचा शिवाजी पार्क मैदानात दसरा मेळावा झाला. या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला लक्ष्य केले. भाजपकडून घराणेशाही आणि भ्रष्टाचाराचा मुद्दा अधोरेखित केला जात आहे. मोदी आणि भाजप नेते याच मुद्द्यावरून विरोधकांना कोंडी पकडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. त्यावरून ठाकरेंनी टीका केली.

ठाकरेंना म्हणाले अर्धवटराव… भाजपने काय म्हटलंय?

भाजपने उद्धव ठाकरेंच्या टीकेला उत्तर दिलं आहे. ठाकरेंना इंडिया आघाडीचे वकील म्हणत भाजपने म्हटलं आहे की, “शिवतीर्थावर अर्धवट भरलेल्या मैदानात अर्धवटरावांनी आज पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर टीका केली आणि घराणेशाही वाचवण्यासाठी एकत्र आलेल्या इंडिया आघाडीची वकिली केली.”

हे वाचलं का?

हे ही वाचा >> Dasara Melava 2023: ‘पुढचं येणारं सरकार एका पक्षाचं नको…’, उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याने खळबळ

घोटाळ्यावरून ठाकरेंना घेरलं

उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला उत्तर देताना भाजपने पुन्हा एकदा भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्द्यावरून घेरलं आहे.”उद्धव ठाकरे यांनी लक्षात ठेवावं, कोविड काळात महाराष्ट्रात लोकांना उपचार मिळत नव्हते, तेव्हा तुम्ही प्रेतांसाठीच्या बॅगामध्येही घोटाळे केले. कोविड सेंटर उभारणीत कुणी लोणी खाल्लं हे लोक विसरले नाहीत. कट कमिशनवर तुम्ही केलेल्या औषध घोटाळ्यांची चौकशी सुरू आहे”, असं भाजपने म्हटलं आहे.

“तुम्हाला हनुमान चालीसाबद्दल ॲलर्जी आहे म्हणून तर हनुमान चालीसा म्हणाऱ्यांना तुरुंगात डांबलं आणि आता व्यंकटेश स्तोत्र आठवत आहे. आम्हाला आज समर्थांची आठवण झाली, त्यांनी तुमच्यासाठीच लिहून ठेवलं असावं.
आपली आपण करी स्तुती |
स्वदेशीं भोगी विपत्ति |
सांगे वडिलांची कीर्ती |
तो येक मूर्ख ||”

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Dasara Melava: ‘ठाकरेंनी पवार साहेबांकडे दोन माणसं पाठवलेली..’, मुख्यमंत्री पदावरून शिंदेंचा गौप्यस्फोट

ADVERTISEMENT

“यापुढे तुम्ही मोदीजींवर टीका केल्यास याच शब्दात तुमचा उद्धार केला जाईल. उद्धवजी एक सांगतो, तुम्हाला आता तुमचे सहकारी सुद्धा कंटाळले आहेत. तो दिवस लवकरच येईल जेव्हा तुम्ही मागे वळून बघाल तेव्हा एकही माणूस शिल्लक राहणार नाही . मी आणि माझे कुटुंब हेच तुमचे विश्व आहे आणि तेच राहील”, अशा शब्दात भाजपने ठाकरेंवर प्रहार केला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT