Vasantrao Chavan Passed Away: महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का! खासदार वसंत चव्हाण यांचं निधन
Vasantrao Chavan : नांदेडचे खासदार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंत चव्हाण यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. हैदराबादमध्ये उपचारादरम्यान 72व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्या काही दिवसांपासून खासदार वसंत चव्हाण यांना श्वास घेण्यास त्रास होतं होता.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का!
खासदार वसंत चव्हाण यांचं निधन
लोकसभा निवडणूक 2024 मध्ये काँग्रेसकडून वसंत चव्हाण रिंगणात उतरले होते.
MP Vasantrao Chavan Death News : नांदेडचे खासदार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंत चव्हाण यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. हैदराबादमध्ये उपचारादरम्यान 72व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्या काही दिवसांपासून खासदार वसंत चव्हाण यांना श्वास घेण्यास त्रास होतं होता. सुरुवातीला नांदेडमधील खासगी रुग्णालयात दाखलकरण्यात आले होते. मात्र प्रकृती खालावल्याने पुढील उपचारासाठी हैदराबादच्या किम्स रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरु असताना आज सकाळी साडेपाच वाजता वसंत चव्हाण यांनी अखेरचा श्वास घेतला. (Maharashtra breaking news nanded mp vasantrao chavan passed away)
ADVERTISEMENT
2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून वसंत चव्हाण रिंगणात उतरले होते. काँग्रेससह महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन अशक्य वाटणारी लढाई वसंत चव्हाणांनी लढली. अशोक चव्हाणांचा पाठिंब्यामुळे भाजप नांदेडची जागा सहज जिंकेल अशी चर्चा होती. मतदारांनी मात्र वसंत चव्हाणांना खासदार करत मातब्बर असणाऱ्या प्रताप पाटील चिखलीकरांचा पराभव केला. एकप्रकारे अशोक चव्हाणांसारखा दिग्गज नेता जाऊनही जिल्ह्यातील काँग्रेस संपली नसल्याचा संदेशच वसंत चव्हाणांनी दिला. 59 हजार 442 मतांनी चव्हाणांनी चिखलीकरांवर मात केली. वसंतराव चव्हाण यांना 5 लाख 28 हजार 894 तर चिखलीकरांना 4 लाख 69 हजार 452 मतं मिळाली होती.
हेही वाचा : Gold Prices Today: सणासुदीला सोने खरेदीदारांच्या खिशाला बसणार कात्री! आज 1 तोळा सोन्याचा भाव किती?
वसंत चव्हाण यांची कारकीर्द गाव पातळीवरुनच सुरु झाली. सरंपच ते आमदार आणि खासदार असा त्यांच्या यशाचा चढता आलेख राहिला आहे. 1978 साली नायगावचे सरपंच झाले,2002 साली जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून गेले, 2009 साली नायगावमधून विधानसभेत पोहोचले.तब्बल 16 वर्षे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात काम करण्याचा चव्हाणांना अनुभव होता. तर 2024 मध्ये नांदेड लोकसभा जिंकत दिल्ली गाठली. याशिवाय एज्युकेशन सोसायटी संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात भरीव काम केले.
हे वाचलं का?
हेही वाचा : PAK vs BAN: "ये खांद्यावरून हात..."; पाकिस्तानच्या संघात पडली वादाची ठिणगी? तो VIDEO व्हायरल
वसंतराव चव्हाण प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेला डायलसिस करत असत. पण नांदेडमध्ये खासदार म्हणून आणि विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या काँग्रेसच्या बैठक सत्रामुळे नियमित आरोग्य चाचण्या करणं जमलं नव्हतं. त्यामुळे वेळीच तपासणी न केल्यानं चव्हाणांची तब्येत बिघडल्याची माहिती आहे.मात्र त्यानंतरही नांदेडमध्ये नुकत्याच झालेल्या काँग्रेसच्या विभागीय बैठकीत त्यांच्या वेगळाच उत्साह दिसून आला होता. काँग्रेसच्या कायर्कर्त्यांमध्येही कठीण काळात खासदार निवडून आल्याचा आनंद होता.
मात्र हा उत्साह आणि आनंद फार काळ टिकला नाही.आज पहाटेच खासदार वसंत चव्हाणांच्या मृत्यूची बातमी येऊन धडकली.वसंतराव चव्हाणांच्या जाण्यानं काँग्रेसनं अनुभवी आणि निष्ठावान नेता गमावला आहे. तर नांदेडच्या जनतेच्या आपला हक्काचा खासदार...
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT