Mahua Moitra : “मला गप्प केल्याने अदाणींचा…”, खासदारकी गेल्यावर महुआ मोइत्रा कडाडल्या
Mahua Moitra : पैसे घेऊन प्रश्न विचारल्याच्या प्रकरणात नीती समितीने त्यांना दोषी ठरवले. समितीच्या शिफारशीनंतर महुआ मोईत्रा यांचे लोकसभेतून निलंबन करण्यात आले.
ADVERTISEMENT

Mahua Moitra news in Marathi : टीएमसीच्या फायर ब्रॅण्ड नेत्या महुआ मोइत्रा यांनी कॅश फॉर क्वेरी प्रकरणात खासदारकी गमवावी लागली. लोकसभेत नीती समितीचा अहवाल मंजूर करण्यात झाल्यानंतर त्यांचे संसद सदस्यत्व रद्द झाले. या मोठ्या कारवाईनंतर बोलताना महुआ मोईत्रांना संताप अनावर झाला. ‘मी अदाणींचा मुद्दा उपस्थित केला होता आणि भविष्यातही मांडत राहीन. कोणतीही रोख भेट मिळाल्याचा कोणताही पुरावा नाही’, असे म्हणत मोईत्रांनी सविस्तर भूमिका मांडली.
लोकसभा सदस्यत्व रद्द झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना महुआ मोइत्रा यांनी सरकारवर तोफ डागली. त्या म्हणाल्या की, “सदस्यत्व काढून टाकण्याची शिफारस केवळ मी माझे पोर्टल लॉगिन शेअर केलेल्या आधारावर केली गेली आहे. यांच्या नियंत्रणाबाबत कोणतेही नियम नाहीत. नीती समितीला निलंबित करण्याचा अधिकार नाही. ही तुमच्यासाठी (भाजप) शेवटाची सुरुवात आहे.”
‘महिला खासदाराला किती त्रास देणार आहात?’
मोईत्रा म्हणाल्या, “जर मोदी सरकारला वाटत असेल की, मला गप्प केल्याने अदाणींचा मुद्दा संपुष्टात येईल, तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही जी घाई केली आणि योग्य प्रक्रियेचा गैरवापर केला. यावरून अदाणी तुमच्यासाठी किती महत्त्वाचे आहे हे दिसते. तुम्ही एका महिला खासदाराला कुठल्या थराला जाऊन त्रास देणार आहात?”, असा सवाल मोईत्रा यांनी केला.
‘महुआ मोईत्रा यांची खासदार म्हणून वागणूक अनैतिक’
महुआ मोईत्रा यांना संसद सदस्यत्वावरून हटवण्याचा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर विरोधी पक्षाच्या खासदारांनी सभात्याग केला. लोकसभेत नीती समितीच्या अहवालावर चर्चा सुरू होताच टीएमसी खासदार सुदीप बंदोपाध्याय यांनी महुआ मोईत्रा यांना सभागृहात त्यांची बाजू मांडण्याची परवानगी देण्याची विनंती केली.