Maratha Morcha : ‘माझी अंत्ययात्रा तरी निघेल नाहीतर मराठा समाजाला…’, मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

manoj jarange patil continue to agitation after meeting girish mahajan maratha reservation
manoj jarange patil continue to agitation after meeting girish mahajan maratha reservation
social share
google news

Girish Mahajan meet Manoj jarange patil : शिंदे सरकारच्या शिष्टमंडळाने आज पुन्हा एकदा जालन्याच्या अंतरावाली सराटी गावात जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. या भेटीत पुन्हा एकदा गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी जरांगे पाटील (Manoj jarange patil) यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र हा प्रयत्न देखील फसला आहे. कारण जरांगे पाटील यांनी आंदोलनावर ठाम राहत सरकारला 4 दिवसाचा अल्टिमेटम दिला आहे. आता या 4 दिवसात तरी आंदोलनावर तोडगा निघतो का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (manoj jarange patil continue to agitation after meeting girish mahajan maratha reservation)

ADVERTISEMENT

गिरीश महाजन,संदिपान भूमरे, अर्जुन खोतक , अतुल सावे या सरकारच्या शिष्टमंडळाने आज पुन्हा मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली. या भेटीत गिरीश महाजन आणि राजेश टोपे यांनी समिती आंध्र प्रदेशातील मराठा समाजाच्या आरक्षणाची माहिती घेण्यासाठी तात्काळ हैदराबादला गेल्याचे सांगितले. या हैद्राबाद दौऱ्यावर मनोज जरांगे पाटील यांनी समितीला मराठवाड्यात येऊन कागदपत्रांचा अभ्यास करण्यास का सांगितले नाही? असा सवाल केला. इतर राज्यातील मराठ्यांना बिनशर्त आरक्षण मिळत असेल तर आम्ही मराठवाड्यातील मराठ्यांना का वगळले? असा सवाल देखील त्यांनी केला.

हे ही वाचा : Chandrayaan 3 : चंद्रावर चालण्याचा फील! ISRO ने शेअर केले विक्रम लँडरचा रंगीत फोटो

जीआर काढण्यासाठी जर मी तुम्हाला 3 महिन्यांची वेळ दिली नसती तर अजून वेळ वाढवण्याचा प्रश्नच येत नाही. मी सलाईन घ्यायला तयार आहे..मी औषध घेईन…पण आंदोलन मागे घेणार नाही…, मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्या नाहीतर मी मरणे पसंत करेन, अशी भूमिका देखील जरांगे पाटील यांनी मांडली. जोपर्यंत मराठ्यांचा समावेश ओबीसी प्रवर्गात केला जात नाही, मला जीआर देत नाही, तोपर्यंत आमरण उपोषण मागे घेणार नसल्याची भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली.

हे वाचलं का?

मी मराठा समाजाला शब्द दिलेला आहे. आता एकतर माझी अंतयात्रा तरी निघेल मराठा आरक्षणाची विजययात्रा निघेल. काळाने जगलो तर तुमला, मेलो तर समाजाचा, त्यामुळे मी असा मेलेलो परवडेल, अशी भूमिका जरांगे पाटीलने घेतली.गिरीश महाजन यांनी एक महिन्याचा वेळ मागितला होता. मात्र जरांगे पाटील उपोषणावर ठाम राहिले. याउलट मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 4 दिवसाचा अल्टिमेटम देत अध्यादेश देण्याची मागणी केली आहे.

सरकारला समितीचा अहवाल घ्यायचा आहे आणि तो आलाय सुद्धा, यासाठी थोडाला वेळ लागतोय.पण आम्ही आंदोलन मागे घेणार नाही, आपण त्यांना आणखीण चार दिवसाचा वेळ दिला आहे. चार दिवसात ते आरक्षणाचा जीआर घेऊन येतील. काळजी करायची नाही आपलं आहे तसं आंदोलन सूरूच राहणार असे जरांगे पाटील यांनी आंदोलकांना सांगितले.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Amravati Murder : डोक्यात संशयाचं भूत शिरलं, युट्यूबर व्हिडिओ बघून आई-भावाला…

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT