किरकोळ कारण.. मित्रांमध्ये वाद अन् 17 वर्षीय तरुणासोबत घडलं नको ते!

मुंबई तक

एका 17 वर्षीय तरुणाला बेदम मारहाण करून त्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. घटनेनंतर, संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणात हत्येचा गुन्हा केला असून सर्व आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती आहे.

ADVERTISEMENT

17 वर्षीय तरुणाला बेदम मारहाण करत हत्या...
17 वर्षीय तरुणाला बेदम मारहाण करत हत्या...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

किरकोळ कारणावरून मित्रांमध्ये वाद अन्...

point

रागाच्या भरात 17 वर्षीय तरुणाला बेदम मारहाण करत हत्या...

Crime News: दिल्लीच्या त्रिलोकपूरी परिसरात एका 17 वर्षीय तरुणाला बेदम मारहाण करून त्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. संबंधित घटना ही मयूर विहार पोलीस स्टेशन हद्दीत घडली असून यामध्ये एका हुशार तरुणाचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. मोहित असं मृताचं नाव असून तो 11 वीत शिकत होता. घटनेनंतर, संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणात हत्येचा गुन्हा केला असून सर्व आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती आहे. 

लाथा-बुक्क्यांनी तरुणाला मारहाण 

ही घटना 5 जानेवारी 2026 रोजी संध्याकाळी जवळपास 7:25 सुमारास घडली. त्यावेळी, मोहित आपल्या मित्रांसोबत त्रिलोकपूरी परिसरात होता. दरम्यान, मोहितचं आधीच एका स्थानिक किशोरवयीन मुलाशी भांडण झालं होतं त्यांचं बोलणं सुरू असताना वाद टोकाला पोहोचला आणि त्याचं मारहाणीत रूपांतर झालं. काही वेळाने, या वादातून पीडित तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. स्थानिकांच्या माहितीनुसार, वाद सुरू असताना मोहितला आरोपी तरुणांनी घेरलं आणि सर्वांनी मिळून त्याच्यावर लाथा-बुक्क्यांनी हल्ला केला. त्यानंतर, मोहित जमिनीवर कोसळला आणि तो गंभीररित्या जखमी झाल्याने जागीच बेशुद्ध पडला. यामुळे, आसपासच्या परिसरात भितीचं वातावरण निर्माण झालं. किरकोळ वादावरून सुरू झालेला वाद इतका टोकाला पोहोचेल, याची कोणालाच कल्पना नव्हती. 

हे ही वाचा: मुंबईची खबर: आता दीड तासांचा प्रवास केवळ 15 मिनिटांत! कल्याण-डोंबिवलीहून थेट नवी मुंबईत पोहोचाल...

गंभीररित्या जखमी झाल्याने तरुणाचा मृत्यू 

दरम्यान, एक प्रत्यक्षदर्शी मोहितला वाचवण्यासाठी पुढे आला असता आरोपींनी त्याच्यावर देखील हल्ला केल्याचा आरोप आहे. त्यानंतर, स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली आणि तेव्हा आरोपी तरुण घटनास्थळावरून फरार झाले. या हल्ल्यात मोहित गंभीररित्या जखमी झाला. घटनेनंतर, पीडित तरुण बेशुद्ध अवस्थेत असताना त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे, प्राथमिक उपचारांनंतर पीडित तरुणाची गंभीर अवस्था पाहून डॉक्टरांनी त्याला GTB रुग्णालयात रेफर केलं. 

हे ही वाचा: बीड हादरलं, भरदिवसा कामगारावर गोळ्या झाडल्या, पण नेम चुकला, मग धारदार शस्त्रांनी वार करुन संपवलं

परंतु, 6 जानेवारी रोजी मोहितचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. या बातमीने कुटुंबियांना मोठा धक्का बसला. या प्रकरणी पोलिसांनी एफआयआर क्रमांक 09/26  नोंदवला आहे. तसेच, भारतीय दंड संहिता (आयपीसी) च्या कलम 103(1), 115(2), 126(2) आणि 3(5) अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणातील सर्व आरोपी अल्पवयीन असल्याकारणाने त्यांना CCL म्हणजेच 'चाइल्ड इन कन्फ्लिक्ट विथ लॉ' अंतर्गत ट्रीट केलं जात आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असल्याचं सांगितलं जात आहे. 
 

हे वाचलं का?

    follow whatsapp