जरांगे-पाटील स्वतःला बॅरिस्टर समजतात की…?, सदावर्तेंनी कायद्याच्या भाषेत सुनावलं
मनोज जरांगे पाटील यांना आता हे सांगायची गरज आहे की, कोणतेही आंदोलन हे कायद्याच्या चौकटीत करायचे असते. कोणावरही टीका आरोप करताना मर्यादा सांभाळावी लागते. लोकप्रतिनिधींची लायकी काढणे, त्यांच्या जातीचा उल्लेख करणे हे कायद्याच्या चौकटीत बसत नाही. त्यामुळे त्यांना आधी कायद्याच्या चौकटीत आणणे गरजेचे आहे असं मत गुणरत्न सदावर्ते यांनी व्यक्त केले.
ADVERTISEMENT

Maratha Reservation: मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आंदोलन केले. त्या आंदोलनानंतर आता जरांगे पाटील राज्यातील वेगवेगळ्या भागाचा दौरा करून मराठा आरक्षणाविषयी सभा घेत आहेत. या सभा घेताना आता आमदार, खासदार आणि मंत्र्यांवर त्यांच्याकडून जोरदार टीका केली जात आहे. मात्र ही टीका करत असताना त्यांच्याकडून वैयक्तिक टीका केली जात असल्याचा आरोप ॲड. गुणरत्न सदावर्ते (Adv. Gunaratna Sadavarte) यांनी केला आहे. त्यांच्यावर टीका करताना त्यांच्याबद्दल त्यांनी काही गंभीर मुद्देही मांडले आहेत. मंत्री छगन भुजबळ यांच्यावर ते खालच्या पातळीवर जाऊन टीका करत असल्याचे मत सदावर्ते यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी टीका करताना आणि बोलताना संयम ठेवावा. त्यांच्या वक्तव्यामुळे राज्यात अशांतता पसरत असल्याचा आरोपही त्यांनी त्यांच्यावर केला आहे
राज्यात अशांतता
ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या भाषणांमुळे राज्यात अशांतता पसरत आहे. त्यामुळे त्यांनी आंदोलन करताना अथवा बोलताना विचारांची लढाई ही विचारांनी केली पाहिजे असा सल्ला त्यांनी त्यांना दिला आहे. यावेळी सदावर्ते यांनी बोलताना त्यांनी भान ठेवावे कारण कोणत्याही आंदोलनाला कायद्याचा आधार असतो, त्याप्रमाणे आंदोलन करावे असंही त्यांनी सांगितले.
खालच्या पातळीवरची टीका
गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन छेडले. त्यानंतर ते राज्याभर दौरा करत आहेत. त्यातून वेगवेगळ्या विचारांमुळे आमदार छगन भुजबळ आणि त्यांच्यामध्ये वाद रंगला. त्यातूनच जरांगे पाटील यांनी आता छगन भुजबळ यांच्यावर टीका करताना खालच्या पातळीवर जाऊन टीका केली जात आहे असं मतही सदावर्ते यांनी व्यक्त केले.
हे ही वाचा >> NIAने उधळला ISISचा कट! ड्रोन हल्ला, IED स्फोट अन्…
सर्वांची लायकी काढतात
मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी बोलताना लोकप्रतिनिधींची लायकी काढतात. त्यांच्या जातीवरून त्यांच्याव टीका करतात. हे कितपत योग्य आहे. तुम्ही आंदोलन करताना ते कायद्याच्या चौकटीत आणि संयमाने करण्याची गरज आहे, कोणाच्याही लायकी काढणं योग्य नसल्याचे सदावर्तेंनी सांगितले आहे.









