Maratha Reservation: 'जरांगे महाराष्ट्राच्या CM, DCM यांना देतात आईवरून शिव्या..', भुजबळ नेमकं काय म्हणाले?

मुंबई तक

ADVERTISEMENT

छगन भुजबळ जरांगेंवर चिडले
छगन भुजबळ जरांगेंवर चिडले
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मराठा आरक्षण विधेयक मंजूर

point

छगन भुजबळ जरांगेवर संतापले

point

जरांगे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना शिवीगाळ करत असल्याचा केला आरोप

Chhagan Bhujbal Criticism Manoj Jarange: मुंबई: मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) राज्य सरकारने आज (20 फेब्रुवारी) एक विशेष अधिवेशन बोलावलं होतं. राज्य सरकारच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मराठा समाजाला 10 टक्के शैक्षणिक आणि नोकरीत आरक्षण देणारे विधेयक विधानसभेत मांडले. त्यानंतर आरक्षणाबाबतचं विधेयक हे एकमताने मंजूर करण्यात आलं. मात्र, त्यानंतर बोलताना कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange) यांच्याविरोधात प्रचंड संताप व्यक्त केला. (manoj jarange used abusing words to maharashtra cm dcm chhagan bhujbal expressed his anger in the assembly maratha reservation vidhansabha)

ADVERTISEMENT

'छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याखाली बसून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना.. आणि आम्हाल तर नेहमीच देतात.. अहो आईवरून शिव्या..' असं म्हणत छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांना टार्गेट केलं. 

मराठा आरक्षण विधेयक मंजूर झाल्यावर, भुजबळ मनोज जरांगेंवर बरसले!

'आज मराठा समाजाला आरक्षण देण्याचा ठराव मंजूर झाला. त्याबद्दल मला विरोध करायचा नाही. किंबहुना आम्ही सांगतच होतो की, वेगळं आरक्षण द्या, वेगळं आरक्षण द्या.. पण ज्या जरांगेचा उल्लेख माननीय मुख्यमंत्र्यांनी केला ते सतत धमक्या देतात. याला टपकवीन, त्याला टपकवीन.. मला स्वत:ला धमकी.' 

हे वाचलं का?

'एवढंच नाही तर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याखाली बसून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना.. आणि आम्हाल तर नेहमीच देतात.. अहो आईवरून शिव्या.. तिथे बसलेले होते महसूल आयुक्त, एसपी, कलेक्टर त्यांना तर म्हणतात तुम्ही भा$@# आहात.. त्यांना देखील आईवरून शिव्या.' 

'ही जी काही दादागिरी सुरू आहे.. याला काही नियंत्रित करणार आहात की नाही? काही कारण नव्हतं.. 27 तारखेलाच सांगितलं होतं, त्यांनी गुलाल उधळला, फटाके वाजवले.. आणि परत 10 तारखेला उपोषणाला बसले. अनेक शहरात बस गाड्या फोडल्या.'

हे ही वाचा >> छगन भुजबळांच्या मागणीनं अनेकांच्या भुवया उंचावल्या, नेमकी मागणी काय?

'एक भीतीचं वातावरण या राज्यात निर्माण करतात. हे थांबायला पाहिजे. आता हे सगळं झाल्यानंतर त्यांचं काय म्हणणं आहे की.. आता ते काय म्हणतात मी उठणार नाही. म्हणजे यांचं भाषण चालूच.. आपण मराठा समाजाला आरक्षण द्यायचा ठराव केला तरी यांचं चालूच.. यांच्यावर काही बोललो तरी ते आम्हाला धमकी देणार..' 

ADVERTISEMENT

'आता त्यांचं म्हणणं आहे की, त्यांना हे आरक्षण नको.. त्यांना ओबीसीमधूनच आरक्षण हवंय. त्यांची ही दादागिरी आणि खोटेपणा आहे तो त्यांच्याच बरोबर काम करणारे भंडारा डोंगरावरचे अजय महाराज बारस्कर हे जे महाराज आहेत त्यांनी सुद्धा माध्यमांमधून स्पष्टपणे सांगितलं आहे की, हे गृहस्थ ऐकणारे नाहीत.'

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण; सरकारच्या विधेयकात काय?

'हे आंदोलन सुरू असताना आम्ही काही बोललो की ताबडतोब धमकी देणार.. ते म्हणतात ओबीसीमधूनच आरक्षण द्या. हा आजचा ठराव त्यांना मंजूर नाही. बारस्कार महाराज आहेत ते देखील तेच सांगतायेत.. त्यांनी जी क्लिप दाखवली त्यामध्ये त्यांनीही सांगितलं की, यांचं मारुतीचं शेपूट वाढतच जाणार.. हे शिवीगाळ करतात.. ते बारस्कर महाराज त्यांना समजवायला गेले होते..' असं म्हणत भुजबळ यांनी जरांगेंविषयी प्रचंड संताप व्यक्त केला.

दरम्यान, आता भुजबळांच्या या संपूर्ण प्रतिक्रियेबाबत मनोज जरांगे नेमकी कशी भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.  

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT