Sharad Pawar : अजित पवारांना बालेकिल्ल्यातच पवारांनी दिला दणका!

मुंबई तक

ADVERTISEMENT

शरद पवार आणि अजित पवार
अजित पवार आणि शरद पवार.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अजित पवारांना पिंपरी चिंचवडमध्ये धक्का

point

२४ स्थानिक नेत्यांनी सोडली साथ

point

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला

Ajit Pawar-Sharad Pawar : ज्या बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार पराभूत झाल्या, त्याच बारामतीतून अजित पवारांनी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीची लाईन ठरली आहे. अशातच ज्या पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांचे दबदबा आहे, तिथेच पक्षाला भगदाड पडले आहे. माजी महापौर, शहरातील महत्त्वाचे पदाधिकारी आणि नेत्यांना पक्षात सामावून घेत शरद पवारांनी अजित पवारांना धक्का दिला. (Many local leaders of Ajit Pawar's NCP joined Sharad Pawar's NCP in pimpri chinchwad)

ADVERTISEMENT

पिंपरी चिंचवड हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. विशेषतः अजित पवारांचे या पट्ट्यात वर्चस्व आहे. मात्र, इथेच अजित पवारांना धक्का बसला आहे. दोन माजी महापौर, चार पदाधिकाऱ्यांसह तब्बल 24 स्थानिक नेत्यांनी अजित पवारांची साथ सोडली आहे. 

पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांची कोणी सोडली साथ?

अजित गव्हाणे यांनी आपल्या समर्थकांसह शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पुण्यातील मोदी बागेत शरद पवारांच्या उपस्थितीत या सर्वांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.

हे वाचलं का?

हेही वाचा >> पूजा खेडकरांना मोठा दणका, नोकरी जाणार? 

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणारे कोण?

- अजित गव्हाणे, शहराध्यक्ष
-हणमंतराव भोसले, माजी महापौर
-वैशाली घोडेकर, माजी महापौर
-पंकज भालेकर, माजी नगरसेवक
-प्रवीण भालेकर, माजी नगरसेवक
- संगीता ताम्हाणे
- दिवंगत नगरसेविका पौर्णिमा सोनवणे यांचे पती रवि सोनवणे. 
- दिवंगत नगरसेवक दत्ता काका साने यांचे पुत्र यश साने
- संजय नेवाळे, माजी नगरसेवक
- वसंत बोराटे, माजी नगरसेवक  
- विजया तापकीर, माजी नगरसेवक  
- राहुल भोसले, शहर कार्याध्यक्ष 
- समीर मासुळकर, माजी नगरसेवक 
- गीता मंचरकर, माजी नगरसेवक
- संजय वाबळे, माजी नगरसेवक 
- वैशाली उबाळे, माजी नगरसेविका
- शुभांगी बोराडे 
- विनया तापकीर 
- अनुराधा गोफने, माजी नगरसेविका
- घनश्याम खेडेकर, माजी नगरसेवक
- सागर बोराटे, युवक राष्ट्रवादी भोसरी विधानसभा अध्यक्ष  
- निवृत्ती मामा शिंदे, माजी सभापती  
- तानाजी खाडे, माजी नगरसेवक
- शशीकिरण गवळी, माजी नगरसेवक
- युवराज पवार, कामगार आघाडी
- विशाल आहेर, सरचिटणीस पिंपरी चिंचवड शहर
- नंदूतात्या शिंदे
- शरद भालेकर

हेही वाचा >> "क्रॉस व्होटिंगमध्ये माझे नाव आल्याचे पाहिले अन्...", आमदार चौधरींनी सोडलं मौन

विधानसभा निवडणुकीआधी चलबिचल

लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला चांगले यश मिळाले नाही. दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने जबरदस्त यश मिळवले. १० पैकी ८ जागा राष्ट्रवादीने जिंकल्या. त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही नेते शरद पवारांच्या बाजूने झुकल्याची चर्चा आहे. त्यातच पिंपरी चिंचवडमधील मोठा गट शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्याने या चर्चेला हवा मिळाली आहे. 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT