Manoj Jarange: ‘मराठ्यांनी ‘तसं’ बोलणाऱ्यांच्या मुस्काटात हाणली..’, जरांगे-पाटील असं का म्हणाले?

रोहित गोळे

ADVERTISEMENT

maratha reservation aggressive speech by manoj jarange patil antarwali sarathi presented six demands of the maratha community before the government
maratha reservation aggressive speech by manoj jarange patil antarwali sarathi presented six demands of the maratha community before the government
social share
google news

Manoj Jarange Patil Sabha speech Live Jalna Antarwali Sarathi: अंतरवाली-सराटी: मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावं यासाठी जालन्यातील अंतरवाली सराटी (Antarwali Sarathi) येथे आज (14 ऑक्टोबर) प्रचंड मोठ्या सभेचे आयोजन करण्यात आलं होतं. मराठा आरक्षणासाठी उपोषण करून एक नेतृत्व उभं केलेल्या मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange-Patil) यांनी आजच्या सभेत जोरदार भाषण केलं. यावेळी त्यांनी मराठा समाज किती एकसंध आहे हे देखील सांगितलं. यावेळी ते असंही म्हणाले की, ‘हा समाज एक होत नाही.. असं बोलणाऱ्याच्या जमून मराठ्यांनी मुस्काटात हाणली.. कोण म्हणतं मराठा एक होत नाही..’ असं म्हणत त्यांनी सुरुवातीलाच सभेवर ताबा मिळवला. (maratha reservation aggressive speech by manoj jarange patil antarwali sarathi presented six demands of the maratha community before the government)

थेट आपल्या रोजच्या बोलीत भाषणाला सुरुवात केलेल्या जरांगेंनी उपस्थितांच्या काळजाला हात घातला. या सभेसाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. तीच गर्दी पाहून मनोज जरांगे सुरुवातीलाच म्हणाले की, ‘हा समाज एक होत नाही.. असं बोलणाऱ्याच्या जमून मराठ्यांनी मुस्काटात हाणली.. कोण म्हणतं मराठा एक होत नाही..’ त्यानंतर बोलताना जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत आपल्या नेमक्या काय सहा मागण्या आहेत हे देखील स्पष्ट केलं.

मनोज जरांगे-पाटलांनी सांगितल्या मराठा समाजाच्या ‘या’ 6 मागण्या

‘आपल्या मराठा समाजाच्या मूळ मागण्या तुम्ही आणि मी हेच सांगतोय.. एक महिनाचा आढावा.. आरक्षण नेमकं कुठं आहे. त्यांच्या लेकराचं भविष्य नेमकं कशात अडलंय. मराठ्यांना आरक्षण नेमकं कोण देत नाही आणि न देण्याचं कारण काय? हे ऐकण्यासाठी लाखो मराठा इथे आले आहेत.’ असं मनोज जरांगे-पाटील यावेळी म्हणाले.

1. पहिली मागणी – आपली प्रमुख मागणी महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

2. दुसरी मागणी – कोपर्डीच्या ताईवर बलात्कार करणाऱ्या नराधमांना फाशी देण्यात यावी.

3. तिसरी मागणी – मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या 45 बांधवांना सांगितलेला निधी आणि सरकारी नोकरी

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Satara: उदयनराजे भोसले राजकारणातून होणार निवृत्त? चक्क शरद पवारांनाही दिला सल्ला!

4. चौथी मागणी – दर दहा वर्षाला आरक्षण दिलेल्या ओबीसी बांधवांचा सर्व्हे करण्यात यावा. तो करण्यात आलेला नाही. सर्व्हे करून प्रगत जाती बाहेर काढण्यात याव्या.

ADVERTISEMENT

5. पाचवी मागणी – सारथी संस्थेमार्फत पीचएडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्तीचा निधी देऊन त्यांचे सगळे प्रश्न तातडीने मार्गी लावण्यात यावेत.

6. सहावी मागणी – महाराष्ट्रातील मराठा समाजाला 50 टक्क्यांच्या आत मराठा म्हणून वेगळा प्रवर्ग करून आरक्षण दिलं तरी चालेल पण एनटी-व्हीजेएनटीचा जसा प्रवर्ग टिकला तसा तो टिकला पाहिजे तरच तो घेणार. 50 टक्क्यांच्या वर आम्ही घेणार नाही.

हे ही वाचा >> NCP: ‘शरद पवारांना राजीनामा द्यायचाच नव्हता’, सुप्रिया सुळेंच्या गौप्यस्फोटाने महाराष्ट्रात खळबळ

‘आता मागण्या तुमच्या लक्षात आल्या. आपल्या लेकराबाळांच्या भविष्याच्या मुद्द्याला आपण हात घालणार आहोत. मराठा समाजासाठी आजचा सुवर्ण क्षण आहे. घराघरातील मराठा साक्षीदार झाला आहे. ते सांगणार आहेत की ऐतिहासिक सभेचा साक्षीदार आहे.’ असंही मनोज जरांगे पाटील यावेळी म्हणाले.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT