‘Maratha, OBC, OPEN, EWS…तू खातो तरी किती?’, जरांगेची नाव न घेता भुजबळांवर टीका

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

maratha reservation manoj jarange patil criticize chhagan bhujbal obc reservation pune daud rally
maratha reservation manoj jarange patil criticize chhagan bhujbal obc reservation pune daud rally
social share
google news

Manoj jarange Patil Criticize Chhagan Bhujbal : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj jarange Patil)  यांनी महाराष्ट्र दौरा सुरू केला. प्रत्येक जिल्ह्यात जाऊन ते मराठा आरक्षणाबाबात (maratha reservation)  जनजागृती करत आहेत. अशात आज दौडमधील दौऱ्यात मनोज जरांगे पाटलांनी भूजबळांवर निशाणा साधला आहे. आता पु्न्हा मराठा आरक्षणाविरोधात बोलला मग उचललाच समजा, असा थेट इशाराच जरांगे पाटलांनी छगन भूजबळांचं (Chhagan Bhujbal) नाव न घेता दिला आहे. तसेच जर राजकीय नेत्यांनी साथ दिली असती तर आतापर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळालं असतं, असे देखील जरांगे पाटील म्हणाले आहेत. (maratha reservation manoj jarange patil criticize chhagan bhujbal obc reservation pune daud rally)

मनोज जरांगे पाटील आज पुणे जिल्ह्यातील दौड तालुक्यातील वरवंड दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी छगन भूजबळांवर निशाणा साधला. आरक्षणाच असचं झालंय आमचं आरक्षण इथे आणि आम्हाला हिंडायला लावलं 50 टक्केच्या वर… त्यातच आमच्या 50 एक पिढ्या गेल्याचे जरांगे पाटील म्हणतात. यावेळी जरांगेनी भूजबळांना लक्ष्य केले. तू आमचं खातो… तू ओबीसींच खातो, ओपनमध्ये येतो, EWS मध्ये येतो…तू खातो तरी किती? तुला सगळ्या दुनियेचचं पुरेना, तरी म्हणतो आमच्यात येत नाही, मग कुणात जातो, त्याचं नाव घेत नाही आता. नाहितर म्हणेल माझ्या एकट्यालाच टार्गेट करतात. त्यामुळे त्याचे नाव घ्यायचा बंद केले असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले.

हे ही वाचा : Crime : 16 वर्षाच्या मुलाने 22 वर्षांच्या गर्लफ्रेंडची केली हत्या, ठाण्यात नेमकं काय घडलं?

मराठा आरक्षण विरोधात अनेक नेत्यांच्या भूमिका आहेत, मात्र मलाच टार्गेट केले जात असल्याचे विधान भूजबळांनी केले होते. त्याच्याच या विधानाचा आधार घेऊन जंरागेनी नाव न घेता त्याच्यावर हल्ला चढवला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मराठ्यांच्या लेकरांना आरक्षण असतानाही घात झाला. या सगळ्यांनी षड्यंत्र केलं. 70 वर्ष सत्तेवर ओबीसी नेत्यांचा किती प्रभाव होता. मराठ्यांची पुरावे असतानाही बाहेर आले नाहीत. यांनी ठरवून षडयंत्र केलं होतं. मराठ्यांना जर आरक्षण दिलं तर मराठ्यांचे पोरं मोठं होतील, मराठ्यांच्या पोरांना मोठं होऊ द्यायचं नाही, यासाठी लागेल ते प्रयत्न करायचे. हे प्रयत्न केले आणि 70 वर्षे मराठ्यांच्या पोरांच्या आयुष्याची राखरांगोळी झाली. पुरावे का सापडू दिले नाहीत. आरक्षणाचे षडयंत्र करून पुरावे लपून ठेवले. मराठ्यांच्या या शक्तीपुढे आता सामान्य मराठ्यांनी हा लढा हातात घेतला आहे, असे जरांगे पाटील म्हणाले आहेत.

हे ही वाचा : Nana Patekar : ‘चूक झाली माफ करा पण…’, टपली मारलेल्या Video वर पाटेकर अखेर बोलले!

    follow whatsapp

    ADVERTISEMENT