Manoj Jarange : जरांगेंच्या आरोपावर शेलार स्पष्टच बोलले, 'देवेंद्र फडणवीसांनी टिकणारे आरक्षण...'

प्रशांत गोमाणे

Ashish shelar Reaction On Manoj Jarange Allegation: देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनीच टिकणारे आरक्षण दिले होते. मराठा समाजाला न्यायिक, टिकणारे आरक्षण देणाऱ्या देवेंद्र फडणवीसांवर असे बिनबुडाचे आरोप करणे, हे आम्हाला मान्य नाही. ते असमर्थनीय आहेत, असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे.

ADVERTISEMENT

maratha resevation ashish shelar reaction on manoj jarange allegation on devendra fadnavis maharashtra politics
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनीच टिकणारे आरक्षण दिले होते. मराठा समाजाला न्यायिक, टिकणारे आरक्षण देणाऱ्या देवेंद्र फडणवीसांवर असे बिनबुडाचे आरोप करणे, हे आम्हाला मान्य नाही. ते असमर्थनीय आहेत, असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे.
social share
google news

Ashish shelar Reaction On Manoj Jarange Allegation, Maratha Reservation : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले होते. या आरोपानंतर आता भाजप नेत्यांनी जरांगे पाटलांवर टीका करायला सुरूवात केली आहे. मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी आता जरांगेंनी देवेंद्र फडणवीसांवर लावलेले बिनबुडाचे आरोप फेटाळून लावले आहेत. (maratha resevation ashish shelar reaction on manoj jarange allegation on devendra fadnavis maharashtra politics) 

आशिष शेलार प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना त्यांनी जरांगेंच्या देवेंद्र फडणवीसांवरील आरोपांवर उत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनीच टिकणारे आरक्षण दिले होते. मराठा समाजाला न्यायिक, टिकणारे आरक्षण देणाऱ्या देवेंद्र फडणवीसांवर असे बिनबुडाचे आरोप करणे, हे आम्हाला मान्य नाही. ते असमर्थनीय आहेत, असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे.  

हे ही वाचा : Video : Rohit sharma ने मैदानातच सरफराझला झापलं,' 'ए भाऊ, हिरो नाही बनायचं इथं''

 मराठा समाजाला न्याय आपण मिळवून देऊ हीच भूमिका सरकारने घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायांशी जी शपथ घेतली त्याप्रमाणे आता 10 टक्के आरक्षण दिले आहे.  समाजाचे अन्य जे विषय प्रलंबित आहेत ते प्रलंबित विषय सुद्धा चर्चेतून सोडवले जाऊ शकतात आणि सोडवले पाहिजेत, असे देखील आशिष शेलारांनी सांगितले.

दरम्यान या सगळ्यांमध्ये कुठल्याही प्रकारे राजकीय रंग देणे हे मराठा समाजाला मान्य नाही. मराठा समाज राजकारण विरहित राहून समाजाला न्याय मिळण्याच्या भूमिकेवरच काम करतो आहे. आणि म्हणून याबाबतीत राजकारण करता कामा नये हीच समाजाची भूमिका आहे, असे शेलार म्हणालेत.  

हे वाचलं का?

    follow whatsapp