‘मातोश्री’ची खरी मम्मी उद्या मुंबईत येणार…’,उद्धव ठाकरेंवर टीका करताना राणेंनी सोडली पातळी!

मुंबई तक

Nitesh Rane : मुंबईत होणाऱ्या इंडियाच्या बैठकीवरून भाजपचे आमदार नितेश राणे यांनी पातळी सोडून टीका केली आहे. त्यामुळे राजकारण तापले आहे.

ADVERTISEMENT

matoshree real mummy is coming to Mumbai tomorrow nitesh rane criticizes uddhav thackeray
matoshree real mummy is coming to Mumbai tomorrow nitesh rane criticizes uddhav thackeray
social share
google news

Nitesh Rane on Uddhav thackeray : भाजपविरोधात विरोधकांनी कंबर कसली आहे. त्यासाठी आता इंडियाची आज मुंबईत बैठक होत आहे. त्या बैठकीवरूनच आता भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन सडकून टीका केली आहे. इंडियाची बैठक आज मुंबईत होत असतानाच काँग्रेस, राष्ट्रवादी आणि त्यांच्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनाही (Shivsena) त्यामध्ये सहभागी होत आहे. त्यावरूनच नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. (matoshree real mummy is coming to Mumbai tomorrow nitesh rane criticizes uddhav thackeray)

भाजपवर कोणताही परिणाम नाही

मुंबईमध्ये इंडियाची बैठक होत असल्याने सत्ताधारी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी विरोधकांच्या बैठकीचा भाजपवर कोणताही परिणाम होणार नाही असं स्पष्ट केले. त्यामुळे 2024 मध्ये आएगा तो मोदीही असा विश्वासही नितेश राणे यांनी टीका केली आहे.

हे ही वाचा >> INDIA: शरद पवार- उद्धव ठाकरेंची महत्त्वाची पत्रकार परिषद

मातोश्रीची मम्मी

इंडियाची बैठक होत असताना नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले आहे. त्यांना लक्ष्य करत असताना त्यांनी मातोश्रीची मम्मी उद्या मुंबईत येत आहे अशी पातळी सोडूनत त्यांनी टीका केली आहे. नितेश राणे यांनी टीका करताच ठाकरे गटाकडूनही त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

वाकण्याचा उच्चांक गाठला

उद्धव ठाकरे यांची वाकून वाकून मान खराब झाली आहे. दिल्लीच्या मम्मी समोर वाकल्यामुळेच त्यांच्या मानेला पट्टा लागला आहे अशी टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली होती. उद्धव ठाकरे यांनी झुकण्याचा आणि वाकण्याचा त्यांनी उच्चांक गाठला आहे, त्यामुळे त्यांनी आमच्या मुख्यमंत्र्यांना नाव ठेवण्याचा अधिकार नाही अशीही टीका त्यांनी त्यांच्यावर केली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp