Milind Deora : “जर मोदी म्हणाले की, काँग्रेस चांगला पक्ष तर…”, देवरांचा ठाकरे-काँग्रेसवर वार
दक्षिण मुंबईचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या भूमिकेवर सडकून टीका केली.
ADVERTISEMENT

Milind deora Joined Shiv Sena : ज्यांनी देशात आर्थिक उदारीकरण आणले, तेच आज उद्योजक आणि उद्योगपतींना देशद्रोही म्हणत आहे. आताची काँग्रेस आणि पूर्वीची काँग्रेस यात खूप फरक आहे. आताच्या काँग्रेसचे उद्दिष्ट फक्त मोदीजी जे बोलतील आणि जे करतील, त्याविरोधात बोलायचं इतकंच आहे”, अशा शब्दात माजी खासदार मिलिंद देवरा यांनी काँग्रेसवर घणाघात केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर देवरांनी काँग्रेस सोडण्याच्या कारणाचा खुलासा केला. (Former MP Milind Deora has joined Shiv Sena of Eknath Shinde)
मुंबईतील मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी मिलिंद देवरा यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यावेळी बोलताना ते म्हणाले, “आजचा दिवस माझ्यासाठी खूप भावनिक आहे. मी खूप भावूक आहे. मी काँग्रेस सोडेन असं कधीच वाटलं नव्हतं. आज माझ्या कुटुंबाचे काँग्रेस पक्षाशी ५५ वर्षांचे जुने नाते शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संपवत आहे. माझं राजकारण नेहमीच सकारात्मक, संरचनात्मक राहिले आहे. आम्हा सर्वांना अभिमान आहे की एकनाथ शिंदे अत्यंत मेहनती, सर्वांसाठी उपलब्ध असलेले जमिनीवरचे नेते आहेत”, अशा शब्दात मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले.
मिलिंद देवरा पुढे म्हणाले, “मुंबई आणि महाराष्ट्रासाठी त्यांचं व्हिजन खूप मोठे आहे आणि त्यामुळे मला त्यांचे हात आणखी बळकट करायचे आहेत. पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांकडे देशासाठी मोठे व्हिजन आहे. शिवसेनेच्या माध्यमातून मला त्यांचे हात बळकट करायचे आहेत.”
माझ्या कुटुंबाचे शिवसेनेशी जुने नाते -मिलिंद देवरा
“माझ्या कुटुंबाचे शिवसेनेशी जुने नाते आहेत. माझे वडील मुरली देवरा हे बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने महापौर झाले आणि माझ्या आईचे माहेरचे नाव फणसळकर असल्याने बाळासाहेब मुरलीभाईंना महाराष्ट्राचे जावई म्हणायचे. एकनाथ शिंदे आणि माझ्या वडिलांमध्ये बरेच साम्य आहेत. दोघेही सामान्य कुटुंबातून आलेले आहे.