MLA Disqualification : ‘शिंदेंनी नेतृत्वाच्या पाठीत खंजीर खुपसून आव्हान दिलं?’, सुनावणीत काय घडलं?

ऋत्विक भालेकर

ADVERTISEMENT

Uddhav Thackeray vs eknath shinde : mla disqualification latest news in marathi
Uddhav Thackeray vs eknath shinde : mla disqualification latest news in marathi
social share
google news

Mla Disqualification latest News : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर शनिवारीही (9 डिसेंबर) विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी झाली. एकनाथ शिंदेंसोबत असलेल्या खासदार राहुल शेवाळींची उलटतपासणी झाली. यावेळी ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी एकनाथ शिंदे यांच्या मुख्यनेता पदावरून सवाल करत शिंदेंच्या खासदाराला खिंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवसेनेच्या आमदारांनी एकनाथ शिंदे यांची शिवसेना मुख्यनेता म्हणून निवड केली होती. त्याच मुद्द्यावरून ठाकरेंच्या वकिलांनी राहुल शेवाळे यांना प्रश्न विचारले. त्याचबरोबर भाजप-शिवसेना युतीबद्दलही काही सवाल ठाकरेंच्या वकिलांनी शिंदेंच्या खासदाराला केले.

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण : राहुल शेवाळेंची उलटतपासणी

देवदत्त कामत : तुमच्या जबाबात पॅरा 5 आणि 6 मध्ये पदाधिकारी महाविकास आघाडीतील घोटाळ्यामुळे नाराज आणि व्यथित झालेले होते, हे खोटे आणि निराधार आहे, हे बरोबर आहे का?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

राहुल शेवाळे : नाही, हे चूक आहे.

देवदत्त कामत : एकनाथ शिंदेंची शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीला समर्थन देता, हे बरोबर आहे का?

ADVERTISEMENT

राहुल शेवाळे : हो.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> BJP : “…तीच भूमिका प्रफुल पटेलांबद्दलही असती”, ठाकरेंवर पलटवार, भाजपने सोडलं मौन

देवदत्त कामत : 2019 च्या निवडणुकीनंतर 23 नोव्हेंबर 2019 रोजी फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्या समर्थनाने घेतली?

राहुल शेवाळे : हो, पण तारीख आठवत नाही.

देवदत्त कामत : शिवसेनेचा मुख्यमंत्री नको म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी घाईघाईने अजित पवार यांच्यासोबत शपथ घेतली का?ह

राहुल शेवाळे : नाही.

देवदत्त कामत : मग फडणवीस आणि अजित पवार यांच्या शपथविधीविरोधात शिवसेनेने सुप्रीम कोर्टात धाव का घेतली होती?

राहुल शेवाळे : मला माहिती नाही.

देवदत्त कामत : शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ नये म्हणून भाजपने युती तोडली का?

राहुल शेवाळे : मला माहिती नाही.

हेही वाचा >> “काय हे दादा? तुम्ही तर आमच्या इज्जतीचा…”, ठाकरेंचं फडणवीसांच्या वर्मावर बोट

देवदत्त कामत : भाजपच्या वागणुकीमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याला बिनशर्त पाठिंबा दिला आणि महाविकास आघाडी जन्माला आली?

राहुल शेवाळे : मला माहिती नाही.

देवदत्त कामत : उद्धव ठाकरे शिवसेनेच्या इतिहासात पहिले ठाकरे, जे मुख्यमंत्री झाले. यामुळे पक्षात सर्वत्र उत्साह होता?

राहुल शेवाळे : मला माहिती नाही.

देवदत्त कामत : तुमच्या प्रतिज्ञापत्रात तुम्ही म्हटलंय की, अनेक वर्षांसाठी राष्ट्रीय कार्यकारिणी आणि प्रतिनिधिसभेची बैठक बोलावली नाही, हे खरं आहे का?

राहुल शेवाळे : नाही.

देवदत्त कामत : एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्षाचा पाठिंबा नव्हता, हे बरोबर आहे का?

राहुल शेवाळे : नाही, हे चुकीचे आहे.

देवदत्त कामत : एकनाथ शिंदे यांनी पक्षाचे नेतृत्व केले आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतला हे चुकीचे आहे की, बरोबर?

राहुल शेवाळे : नाही, चुकीचे आहे.

देवदत्त कामत : एकनाथ शिंदे यांना पक्षाचा नेता कधी निवडण्यात आले?

राहुल शेवाळे : तारीख आठवत नाही.

देवदत्त कामत : एकनाथ शिंदे यांना 18 जुलै 2022 रोजी पक्षाच्या नेतेपदी निवडण्यात आले का?

राहुल शेवाळे : परिच्छेदामध्ये जो प्रश्न विचारलेला आहे, त्याचा उल्लेखच नाही.18 जुलै 2022 रोजी एकनाथ शिंदे यांची मुख्य नेता म्हणून निवड झाली.

देवदत्त कामत : शिवसेना संघटनेत मुख्य नेता हे पद आहे का?

राहुल शेवाळे : हो.

देवदत्त कामत : तुम्ही आज जी पक्षाची घटना वापरत आहात, त्यात मुख्य नेता हे पद कुठे आहे, ते आता दाखवू शकता का?

राहुल शेवाळे : घटनेत मुख्य नेत्याची दुरुस्ती झाली होती.

देवदत्त कामत : ही कथित दुरुस्ती कधी करण्यात आली?

राहुल शेवाळे : तारीख आठवत नाही.

देवदत्त कामत : घटनेतील कथित दुरुस्ती ज्यामध्ये मुख्य नेता पद 21 जून 2022 नंतर करण्यात आलं आणि हे बेकायदेशीर आहे. याचा कुठलाही संबंध या कार्यवाहीत येत नाही?

राहुल शेवाळे :नाही, हे चूक आहे.

देवदत्त कामत : एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरे यांनी 23 जानेवारी 2018 रोजी नेतेपदी निवड केली, हे बरोबर आहे का?

राहुल शेवाळे : तारीख आठवत नाही.

देवदत्त कामत : उद्धव ठाकरे हे कायम आपल्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहिलेत आणि त्यांचं त्यांना समर्थन आहे?

राहुल शेवाळे : नाही.

देवदत्त कामत : एकनाथ शिंदे यांनी समोरून नेतृत्व नाही केलं, तर पक्ष नेतृत्वाच्या पाठीत खंजीर खुपसून नेतृत्वाला आव्हान दिले?

राहुल शेवाळे : नाही.

देवदत्त कामत : (घटनेतील कलमे सुनील प्रभू यांच्याकडून वाचण्यात आली.) ‘शिवसेना पक्ष बाळासाहेब ठाकरे यांचा आहे आणि शिवसेनेशी बेईमानी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार उद्धव ठाकरे यांना राष्ट्रीय कार्यकारिणीकडून देण्यात येत आहेत.’ तुम्ही या मजकूराशी सहमत आहेत का?

राहुल शेवाळे : नाही.

देवदत्त कामत : 25 जून 2022 रोजी तुम्ही शिवसेना भवनात हजर होता का?

राहुल शेवाळे : हो.

देवदत्त कामत : 25 जून 2022 रोजी शिवसेना भवनात जो राष्ट्रीय कार्यकारिणीचा ठराव मंजूर झाला, त्याला तुम्ही पाठिंबा दिला होता का?

राहुल शेवाळे : नाही.

देवदत्त कामत : तुमच्याविरोधात संसदेत अपात्रतेची याचिका दाखल आहे का?

राहुल शेवाळे : नाही.

देवदत्त कामत : तुम्हाला शिवसेना संसदीय दलाचा नेता कधी निवडण्यात आले?

राहुल शेवाळे : तारीख माहिती नाही.

देवदत्त कामत : हे जून 2022 च्या आधी कि नंतर झाले?

राहुल शेवाळे : आठवत नाही.

देवदत्त कामत : तुमच्या आधी कोण पदावर होते?

राहुल शेवाळे : विनायक राऊत.

देवदत्त कामत : तुम्हाला निवडण्याआधी विनायक राऊतांवर कोणती चौकशी सुरु होती का?

राहुल शेवाळे : नाही.

देवदत्त कामत : पॅरा 8 मध्ये तुमच्या प्रतिज्ञापत्रात नमूद ठरावाचा उल्लेख केला आहे, तो बनावट आहे का?

राहुल शेवाळे : नाही.

देवदत्त कामत : 12 लोकसभा सदस्यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्य नेता कधी मानलं?

राहुल शेवाळे : तारीख आठवत नाही.

देवदत्त कामत : पॅरा 15 सिम्बॉल ऑर्डर संदर्भात याचिका दाखल होण्याआधी एकही लोकसभेतील खासदारांचा एकनाथ शिंदेंना पाठिंबा नव्हता?

राहुल शेवाळे : नाही. हे चूक आहे.

देवदत्त कामत : मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की, एकनाथ शिंदे यांना कुठल्याही शिवसेना लोकसभा सदस्याचा 20 जून 2022 आधी पाठिंबा नव्हता.

राहुल शेवाळे : नाही, हे बरोबर नाही.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT