'काका-पुतण्याचं नातं काँग्रेसला धार्जिण', जयंत पाटलांचा नेमका निशाणा कोणाकडे...

मुंबई तक

ADVERTISEMENT

Jayant Patil Ajit Pawar Sharad Pawar Congress
Jayant Patil Ajit Pawar Sharad Pawar Congress
social share
google news

Jayant Patil : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण काका-पुतण्याच्या राजकीय खेळींनी ढवळून निघाले आहे. त्यातच आज लातूर तालुक्यातील निवळीमध्ये विलासराव देशमुख यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाला काँग्रेसह राष्ट्रवादी काँग्रेसमधीलही दिग्ग्ज नेते उपस्थित होते. शरद पवार (Sharad Pawar) गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील (MLA Jayant Patil) यांनी काँग्रेसवर आणि विलासराव देशमुखांच्या (Vilasrao Deshmukh) आठवणी सांगताना त्यांनी काका-पुतण्याच्या नात्यावर भाष्य करत अजित पवारांवर (Ajit Pawar) जोरदार निशाणा साधला. आमदार जयंत पाटील यांच्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही काका-पुतण्याच्या नात्यावर बोलत त्यांनी पटोलेनीही टोला लगावला आहे. 

नातं तोडू नये

'राजकारणात कसंही वागलं तरी चालतं  मात्र कोणतंही व्यक्तिगत नातं तोडू नये' अशी खोचक प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी यावेळी दिली. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार आणि अजित पवार यांच्या राजकीय वादामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. त्यावरूनच जयंत पाटील यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. 

देशमुखांचे संबंध मधूर

आमदार जयंत पाटील यांनी बोलताना सांगितले की, 'काँग्रेसचं बरय काका-पुतण्याचं नातं काँग्रेसला धार्जिण दिसतं. विलासराव देशमुख यांचे बंधू दिलीपराव देशमुख हे उत्तम प्रकारे नेतृत्व करतात पण त्यांचे आणि अमित देशमुखांचे संबंध मधूर आहेत. शेवटी व्यक्तिगत नातं टिकवताना राजकारणात कोणी कसंही वागलं तरी चालतं पण व्यक्तिगत नातं तोडण्याची भूमिका राजकारणात घेता कामा नये.' असं मत व्यक्त करत त्यांनी काका पुतण्याच्या नात्यावर टिप्पणी केली. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

देशमुखांमध्ये अविश्वास नाही

जयंत पाटील यांच्यानंतर काँग्रेसच्या नाना पटोले यांनीही पवार कुटुंबीयांवर निशाणा साधला. पटोले यांनी बोलताना म्हणाले की,'
आजच्या राजकारणातील फरक जयंतराव पाटील यांनी मांडला. त्यांनी काका-पुतण्याचं उदाहरण मांडलं. मात्र ज्या परिवारात अविश्वास असेल तिथं काका पुतण्याचं भांडण होणार. मात्र देशमुख परिवारात अविश्वासच नव्हता. त्यांच्यामध्ये विश्वासच होता, त्यामुळे गडबड होण्याचं कारण नाही असं म्हणत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार टोला लगावला आहे. 

राजकीय वाद

नाना पटोले आणि जयंत पाटील यांच्या काका पुतण्याच्या टीका टिप्पणीनंतर राजकीय वाद पुन्हा उफाळून येण्याची शक्यताही असल्याचं  मतही व्यक्त केलं जात आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Narendra Modi: 'देशाच्या विकासासाठी महिलांसाठी विशेष योजना आणल्या'

    follow whatsapp

    ADVERTISEMENT