Video: पायाने तुडवीन, लोळेस्तोवर मारेन, संतोष बांगरांनी नेमकी कुणाला दिली धमकी?

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

mla santosh banger threatens to msrtc bus conductor video viral in social media
mla santosh banger threatens to msrtc bus conductor video viral in social media
social share
google news

शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (santosh banger) पुन्हा वादात सापडण्याची शक्यता आहे. कारण आता बांगरांचा एक वादग्रस्त व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत बांगर यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या हिंगोली आगार प्रमुखाला धमकी दिली आहे. पायाने तुडवीन आणि लोळेस्तोवर मारेन अशा आशयाची धमकी संतोष बांगर यांनी आगारप्रमुखाला कार्यालयात बोलावून दिली आहे. या संदर्भातला त्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (mla santosh banger threatens to msrtc bus conductor video viral in social media)

हिंगोलीच्या शाळकरी मुले आणि मुली एसटी बसच्या वाहकाची तक्रार घेऊन आमदार संतोष बांगर यांच्या कार्यालयात पोहोचल्या होत्या. यावेळी आमदार संतोष बांगर यांनी आगार प्रमुखांना आपल्या कार्यालयात बोलावून घेतले. कोण मा##### कंडक्टर आहे.तुम्हाला सांगतो अशा कंडक्टरला मी पायाखाली तुडवेन, तुम्हाला माहिती आहे, मी जेवढा चांगला आहे, तेवढाच वाईट आहे. मला काही कमी जास्त वाटलं तर मी त्या कंडक्टरला लोळेस्तोवर मारेने हे ध्यानात ठेवा, या लेकरांची गैरसोय झाली नाही पाहिजे. हे विद्यार्थी 4.30 वाजता पोहोचल्यावर 5 वाजेपर्यंत बसमध्ये बसले पाहिजेत,असे व्हिडिओ बोलताना संतोष बांगर दिसत आहेत. याचसोबत संतोष बांगर यांनी तात्काळ त्या ठिकाणी एखादी महिला किंवा अनुभवी वाहक द्यावा अशी मागणी देखील आगार प्रमुखांकडे केली आहे.

हे ही वाचा : नितीन गडकरींचा भाजपला टोला, संजय राऊत म्हणाले,’अभिनंदन! सत्य परिस्थिती…’

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दरम्यान संतोष बांगर यांनी पायाने तुडवीन आणि लोळेस्तोवर मारेन अशा आशयाची हिंगोली आगार प्रमुखाला धमकी दिल्याचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. आता हा व्हिडीओ समोर आल्यानंतर बांगर यांच्या या वक्तव्याचे काय पडसाद उमटतात पाहणे गरजेजेचे आहे.

हे ही वाचा : Sanjay Raut:फोटोला चिखल फासला, ‘सामना’ची होळी! CM शिंदेंच्या ठाण्यात काय घडलं?

बांगरांवर गुन्हा दाखल

दरम्यान याआधी आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar) यांनी 18 जानेवारी 2023 तंत्रनिकेतन महाविद्यालयात घुसून थेट प्राचार्यांना मारहाण केली होती. या प्रकरणी प्राचार्य अशोक उपाध्याय यांच्या फिर्यादीवरून आमदार बांगर आणि तंत्रनिकेतन महाविद्यालयातील सहा शिक्षिका आणि शिक्षक यांच्या सह 40 कार्यकर्त्यांवर महाविद्यालयात प्रचार्य कक्षात जाऊन फिर्यादी आणि साक्षीदार यांना शिवीगाळ करून मारहाण केली याच बरोबर शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या कारणावरून विविध कलमांतर्गत हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT