K Kavitha Net Worth: दिल्ली दारू घोटाळ्यात अटक केलेल्या के. कविताकडे किती संपत्ती?

मुंबई तक

ADVERTISEMENT

के. कविता यांच्याकडे नेमका किती पैसा?
के. कविता यांच्याकडे नेमका किती पैसा?
social share
google news

K Kavitha: हैदराबाद: दिल्ली दारू प्रकरणी मोठी कारवाई करत अंमलबजावणी संचलनालय (ED)ने शुक्रवारी तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री केसीआर यांची कन्या आणि  बीआरएसच्या आमदार (BRS MLC) यांना अटक केली. अशी माहिती आहे की, तपास यंत्रणेने कविता यांना हैदराबादहून दिल्लीला आणणार आहेत. वास्तविक, दिल्ली दारू प्रकरणासंदर्भात शुक्रवारी कविता यांच्या हैदराबाद येथील निवासस्थानावर ईडीने छापा टाकले. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. (mlc kalvakuntla kavitha arrested by ed in delhi liquor scam how much wealth does kavitha have)

के. कविता (Kalvakuntla Kavitha) माजी खासदार असण्याव्यतिरिक्त, एक व्यावसायिक महिला देखील आहेत. ज्यांच्याकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती आहे. कविता यांनी शेअर बाजारापासून (Stock Market) ते सरकारी योजनांपर्यंत सर्वच क्षेत्रात मोठी गुंतवणूक केली आहे. त्यांच्यावर मोठी कर्जही आहेत. तसचे कोट्यवधी रुपयांची शेतजमीनही आहे. के. कविता यांनी 1999 मध्ये VNR VJIIT, जवाहरलाल नेहरू तंत्रज्ञान विद्यापीठातून पदवी प्राप्त केली आहे. आपण त्यांच्याकडे एकूण किती संपत्ती आहे ते जाणून घेऊया.

40 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती

केसीएआर यांची कन्या के. कविता (Kalvakuntla Kavitha Net Worth)यांची एकूण संपत्ती 39.79 कोटी रुपये आहे. मात्र, रोख रकमेचा विचार केला तर त्यांच्याकडे केवळ एक लाख रुपये आहेत. कविता यांच्या बँक खात्यात 37 लाखांहून अधिक रक्कम जमा आहे. त्याचवेळी त्यांनी 17.88 कोटी रुपयांचे रोखे, डिबेंचर्स आणि कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवले आहेत. Myneta.com नुसार, के. कविता यांनी सरकारी योजनांमध्ये पैसेही गुंतवले आहेत. त्यांनी येथे सुमारे दोन कोटी रुपये गुंतवले आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

कविता यांच्या नावावर प्रचंड कर्ज

Myneta.com नुसार, KCR यांच्या मुलीवर 21 कोटी रुपयांहून अधिक कर्ज आहे (Loan on Kalvakuntla Kavith). ज्यामध्ये त्यांनी कार लोन म्हणून 2.62 कोटी रुपये घेतले आहेत आणि गोल्ड लोन आणि इतर कर्ज 19 कोटी रुपये आहे. याशिवाय शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी त्यांनी 7 कोटी रुपयांचे वैयक्तिक कर्जही घेतले आहे.

सुमारे 2 किलोच्या दागिन्यांच्या मालकीण

के. कविता यांच्याकडे 1.95 किलो सोने आणि हिरे, तर 11.2 किलो चांदी आहे. त्यांच्या पतीकडे 200 ग्रॅम सोने असून दोघांकडे सुमारे 77 लाख रुपयांचे दागिने आहेत. त्यांच्याकडे 88.66 लाख रुपयांची इतर मालमत्ताही आहे. कविता यांच्या कार कलेक्शनमध्ये टोयोटा फॉर्च्युनर आहे, ज्याची किंमत 7.58 लाख रुपये आहे. तसेच त्यांच्या नावावर कृषी, अकृषिक, व्यावसायिक आणि निवासी घरे असून, त्यांची एकूण किंमत 10.87 कोटी रुपये आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT