Ambadas Danve: भाजप आमदाराला शिव्या देणं भोवलं, अंबादास दानवेंवर मोठी कारवाई
Ambadas Danve Suspend: विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पाहा नेमकं किती दिवसांसाठी निलंबन करण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT

Vidhan Parishad Ambadas Danve: मुंबई: राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात काल (1 जुलै) विधानपरिषदेत तुफान राडा झाला. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजप आमदार प्रसाद लाड यांना शिवीगाळ केली होती. पण आता याचप्रकरणी अंबादास दानवे यांच्याविरोधात उपसभापती निलम गोऱ्हे यांनी मोठी कारवाई केली आहे. (monsoon session maharashtra vidhan parishad big action against ambadas danve for abusing bjp mla prasad lad)
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेल्या भाषणातील एका विधानवरुन काल महाराष्ट्राच्या विधानपरिषदेत रण पेटलं होतं. राहुल गांधींच्या याच भाषणावर अंबादास दानवेंनी आपली विरोधी पक्षनेते दानवेंनी भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली होती. पण त्याचवेळी वाद एवढा पेटला की, अंबादास दानवे यांनी भर सभागृहात भाजप आमदार प्रसाद लाड यांना शिवीगाळ केली. ज्यावर बराच गदारोळ झाला आणि त्यामुळेच आज (2 जुलै) दानवेंवर कारवाई करण्यात आली.
हे ही वाचा>> Vidhan Parishad Election : ठाकरेंच्या खेळीने मोठा ट्विस्ट! 'या' नेत्याला तिकीट
अंबादास दानवे यांचं निलंबन करण्यात यावं यासाठी प्रसाद लाड यांनी आज एकट्याने विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. ज्यानंतर आज विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी अंबादास दानवे यांचं 5 दिवसांसाठी निलंबन केलं आहे. त्यामुळे आता पुढील 5 दिवस विधानपरिषदेत विरोधी पक्षनेतेच नसतील.
निलंबनानंतर विरोधकांचा गदारोळ
दरम्यान, नीलम गोऱ्हेंनी केलेल्या कारवाईनंतर विरोधकांनी सभागृहा बराच गदारोळ केला. या प्रस्तावावर चर्चा झाली पाहिजे अशी विरोधकांकडून मागणी केली जात होती. यावेळी उपसभापतीविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.