Vidhan Parishad Election : ठाकरेंच्या खेळीने मोठा ट्विस्ट! 'या' नेत्याला तिकीट
Milind Narvekar Vidhan Parishad Election : विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक होणार हे स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडीकडे दोन उमेदवार निवडून आणण्याची ताकद असताना आता उद्धव ठाकरेंनी नार्वेकरांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक २०२४
मिलिंद नार्वेकर शिवसेने UBT कडून निवडणूक लढवणार
विधान परिषद निडवणुकीत उद्धव ठाकरेंची मोठी खेळी
Vidhan Parishad election Milind Narvekar Uddhav Thackeray : विधान परिषदेच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला आहे. ११ जागांसाठी निवडणूक होत असताना १२ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे निवडणुकीसाठी मतदान होणार, हे स्पष्ट झाले आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने मोठी खेळी करत मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता नार्वेकरांच्या उमेदवारीमुळे महायुतीचे टेन्शन वाढणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. (Milind Narvekar Will Contest Maharashtra Assembly Council Election 2024)
ADVERTISEMENT
विधान परिषद निवडणुकीत महायुतीकडे 9 उमदेवार निवडून आणण्यासाठी आवश्यक असणारे आमदारांचे संख्याबळ आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीकडे दोन उमेदवार निवडून येतील इतकेच संख्याबळ आहे. असे असताना महाविकास आघाडीने आता तीन उमेदवार उतरवले आहेत.
हेही वाचा >> शिंदेंचे उमेदवार ठरले! 'हे' दोन नेते आमदार होणार
महाविकास आघाडीतील काँग्रेसने प्रज्ञा सातव यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांना पाठिंबा दिला आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने मात्र उमेदवार उतरवण्याचा निर्णय घेतला आहे.
हे वाचलं का?
मिलिंद नार्वेकर लढवणार निवडणूक
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून मिलिंद नार्वेकर हे निवडणूक लढवणार आहेत. शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सध्या 15 आमदार आहेत. तर निवडून येण्यासाठी 23 मते आवश्यक आहेत. त्यामुळे 8 मते कमी पडतात.
हेही वाचा >> निकाल लागला! भाजपला दोन ठिकाणी झटका, ठाकरेंचा एक उमदेवार पराभूत
प्रज्ञा सातव यांना उमेदवारी देणाऱ्या काँग्रेसकडे सध्या 36 मते आहेत. काँग्रेसची 24 मते प्रज्ञा सातव यांना दिली गेली, तर 12 मते शिल्लक राहतात. ही मते आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मते मिळून शेकापचे जयंत पाटील निवडून येऊ शकतात. त्यामुळे आता ठाकरे नार्वेकर जिंकून येण्यासाठी लागणारी 8 मते कशी मिळवणार, याची चर्चा होत आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT