ST Bus Strike : एसटी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे, CM शिंदेंसोबतच्या बैठकीत काय निघाला तोडगा?
ST Bus Strike : एसटी कर्मचाऱ्यांनी अखेर संप मागे घेतला आहे. एसटी कर्मचाऱ्यांची नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक पार पडली आहे. या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या आहेत. विशेष म्हणजे शासनाने एसटी कर्मचाऱ्यांच्या मुळ वेतनात साडे 6 हजाराची वाढ केली आहे. या बैठकीनंतर एसटी संपावर तोडगा निघाला आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
एसटी संपावर अखेर तोडगा
एसटी कर्मचारी संप मागे घेणार
मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत काय चर्चा झाली?
ST Bus Strike : एसटी कर्मचाऱ्यांनी अखेर संप मागे घेतला आहे. एसटी कर्मचाऱ्यांची नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक पार पडली आहे. या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या आहेत. विशेष म्हणजे शासनाने एसटी कर्मचाऱ्यांच्या मुळ वेतनात साडे 6 हजाराची वाढ केली आहे. या बैठकीनंतर एसटी संपावर तोडगा निघाला आहे. त्यामुळे थोड्याच एसटी कर्मचारी संप मागे घेणार आहेत. त्यामुळे सर्वसामन्य नागरीकांना मोठा दिलासा मिळणार आहे. (msrtc employee strike take bac cm enkath shinde meeting government increase st worker sallery)
राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी महामडळातील कर्मचाऱ्यांना वेतन द्यावे. या प्रमुख मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत आंदोलनाची हाक दिली होती. या आंदोलनामुळे गणपतीत कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचे मोठे हाल झाले होते. त्यामुळे या संपाच्या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 7 वाजता संघटनांच्या प्रतिनिधींची तातडीची बैठक घेतली. त्यामध्ये एसटीच्या संपावर बैठकीमध्ये तोडगा काढण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना दि.1 एप्रिल, 2020 पासून सरसकट मुळ वेतनात 6500 रुपये वाढ करण्याचा ऐतिहासिक निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयानंतर एसटी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आणि एसटी कर्मचारी संप मागे घेणार आहेत.
हे ही वाचा : Toll Free Pass: बाप्पाची कृपा... गणेशभक्तांना टोल माफी, असा डाऊनलोड करा फ्री Toll पास!
राज्य शासन एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक असताना उत्सवाच्या काळात संप करून सामान्यांना वेठीस धरणे योग्य नाही असे सांगत बैठकीच्या सुरूवातीलाच मुख्यमंत्री शिंदे यांनी संपाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
संघटनांनी यावेळी केलेल्या वेतनवाढीच्या मागणीबाबत मधला मार्ग काढून एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याची भूमिका असल्याचे सांगत एप्रिल 2020 पासून कर्मचाऱ्यांच्या मुळ वेतनात 6500 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला. त्याचबरोबर राज्यातील आगारांमध्ये चालक-वाहकांसाठी असणारी विश्रामगृहांची दुरवस्था दूर करण्यासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. चालक-वाहकांना चांगल्या सोयीसुविधा मिळायला पाहिजेत, असे सांगतानाच एसटीचा महसुल वाढीसाठी कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.
हे ही वाचा : Anil Deshmukh : अनिल देशमुख पुन्हा तुरुंगात जाणार? CBI कडून गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
एसटी कर्मचाऱ्यांना वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती बाबत विषयी चर्चा करताना राज्य शासनाने सर्वांसाठी महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना केली असून त्याच्याशी संलग्न योजना एसटी महामंडळाने करावी, त्याचा लाभ कर्मचाऱ्यांना होईल, अशी सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
ADVERTISEMENT
भाजप नेते गोपीचंद पडळकर म्हणाले, सगळ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात सरसकट 6500 रुपयांची पगार वाढ केलेली आहे. ज्यांच्या पगारामध्ये 2021 पाच हजार रुपयांची वाढ झाली होती. त्यांच्या मूळ पगारामध्ये दीड हजार रुपयांची वाढ झालेली आहे. ज्यांना चार हजारांची वाढ दिली होती, त्यांच्या पगारामध्ये अडीच हजारांची वाढ झाली आहे. ज्यांना 2021 मध्ये अडीच हजारांची वाढ झाली होती, त्यांच्या पगारात 4 हजारांची वाढ झाली आहे. मी महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांच्या वतीने सरकारचे आभार व्यक्त करतो. सर्व संघटनांनी मुख्यमंत्री महोदयांच्या निर्णयाचे स्वागत केले आहे, अशी प्रतिक्रिया गोपिचंद पडळकर यांनी दिली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT