मुंबई Tak चावडी: ‘…तर त्या माणसाला आयुष्यातून उठवायचं?’, ‘मनातील मुख्यमंत्री’वरुन पंकजा मुंडेंचा कोणावर निशाणा?

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbai tak chavadi bjp leader pankaja munde target on devendra fadnavis on her chief minister ship statement
mumbai tak chavadi bjp leader pankaja munde target on devendra fadnavis on her chief minister ship statement
social share
google news

Pankaja Munde Mumbai Tak Chavadi: मुंबई: भाजप (BJP) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी मुंबई Tak च्या चावडीवर (Mumbai Tak Chavadi) बोलताना अनेक गौप्यस्फोट केले. मात्र, यावेळी त्यांनी ‘लोकांच्या मनातली मुख्यमंत्री’ या विधानाबाबत देखील भाष्य केलं. पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या की, ‘मी मनातील मुख्यमंत्री असं विधान केलं नव्हतं. पण असं विधान केलं असेल तरी तरी त्यात चुकीचं काय होतं? म्हणजे असं काय आभाळ कोसळलंय की, त्या माणसाला आयुष्यातून उठवायचं..? असं नसतं ना.. राजकारणात.’ असं म्हणत पंकजा मुंडेंनी पक्षांतर्गत विरोधकांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. (mumbai tak chavadi bjp leader pankaja munde target on devendra fadnavis on her chief ministership statement)

ADVERTISEMENT

चावडीवर पंकजा मुंडेंना असं विचारण्यात आलं की, मनातील मुख्यमंत्री असं विधान केल्यापासून तुमचे राजकीय पंख कापण्यास सुरुवात झाली का? याबाबत बोलताना पंकजा मुंडे यांनी सविस्तर उत्तर दिलं.

‘माझ्या ज्या मनात वेदना आहेत… ज्या मलाही कळल्या नाहीत त्या तुम्हाला कळल्या आहेत असं मला वाटतं. पहिले तर एक गोष्ट की.. मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री या विषयाचा त्रास झाला का? हा वेगळाच विषय आहे. पण.. हे मी बोलले नाही.. यावर मी अनेकदा स्पष्टीकरण दिलं आहे. जर असं असेल जे तुम्ही बोलताय तर हे काय चांगलं आहे का?’

‘मी ते बोललेच नाही ना.. मी डिफेंड करत राहिले ना.. मी असं म्हटली नाही.. मी असं म्हटली नाही.. आता हे म्हणाल्यावर माझ्या डोक्यात ट्यूब पेटली. मी फक्त तेवढं जर म्हटले असेल तर त्यामुळे असं काही होत असेल तर ते चांगलं नाही.’

‘म्हणजे मत तयार झालं आहे. आता ते काही मी तयार केलेलं नाही. मी काही ग्रामपंचायतची सदस्य नव्हते. मी म्हटले नाही मनातील मुख्यमंत्री.. पण आपण समजू ढोबळमानाने की मी म्हटले ते वाक्य.. तर काय?’

‘म्हणजे असं काय आभाळ कोसळलंय की, त्या माणसाला आयुष्यातून उठवायचं..? असं नसतं ना.. राजकारणातून.. असं जर मत तयार झालं असेल.. हे खरं आहे की नाही यावर मी निर्णय देऊ शकत नाही. पण हे जे म्हणतायेत तसं जर परसेप्शन असेल तर ते परसेप्शन चांगलं गेलेलं नाही.’ असं म्हणत पंकजा मुंडेंनी अप्रत्यक्षपणे विरोधकांवर निशाणा साधला आहे.

हे ही वाचा >> Mumbai Tak Chavadi: ‘विधानपरिषदेचा फॉर्म भरलेला, शेवटच्या क्षणी सांगितलं आता…’, पंकजा मुंडेंचा गौप्यस्फोट

 

हे वाचलं का?

पंकजा मुंडे लोकसभा की विधानसभेची निवडणूक लढवणार?

दरम्यान, याचवेळी पंकजा मुंडेंना लोकसभा की विधानसभा निवडणूक लढवणार? असाही प्रश्न विचारण्यात आला. ज्यावर बोलताना त्या म्हणाल्या, ‘निवडणूक ही आवडते ती आवडते असं काही नसतं.. ते त्या वेळच्या परिस्थितीनुसार ठरत असतं. पण मी हे स्पष्ट केलं आहे की, प्रीतमला विस्थापित करून मी प्रस्थापित होणार नाही. पण निवडणुकीबाबत विचार केलेला नाही.’

हे ही वाचा >> उद्धव ठाकरेंची सोडली साथ, मुंबईतील ‘हे’ तीन स्थानिक नेते शिंदेंच्या सेनेत

‘प्रीतमच्या बाबतीत जो निर्णय पक्ष घेईल त्याबाबत मला नाही पटू शकत असं होऊ शकतं. कारण 10 वर्ष खासदार असलेल्या मुलीला घरी बसवून मी माझं राजकारण करणं त्या सगळ्या 50 मतदारसंघात जे माझ्यावर प्रेम करतात. जिथे लोकांना फरक पडतो, त्यांना वाटेल की ही स्वार्थी बहीण आहे. हिने आपल्या बहिणीला घरी बसवून स्वत:चं राजकारण साधलं. आताचा काळात स्वत:ला कसं पद मिळेल हे बघणाऱ्या राजकारण्याची तुम्हाला सवय झाल्यामुळे अशा वक्तव्याला तुम्ही वेगळ्या अर्थाने घेतलं.. की पक्षाबद्दल पंकजा अवज्ञा करतायेत.. तर नाही. पंकजा मुंडे एखाद्या पदाचा कदाचित त्याग करून एक भूमिका घेतात हा त्याचा अर्थ आहे.’ असंही त्या म्हणाल्या.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT