मुंबई Tak Chavadi: अफजल खान, औरंगजेबाच्या कबरीबाबत संभाजीराजे छत्रपती थेट म्हणाले, ‘शिवाजी राजांनी…’

साहिल जोशी

ADVERTISEMENT

mumbai tak chavadi sambhajiraje chhatrapati gave a solid answer regarding afzal khan aurangzebs grave
mumbai tak chavadi sambhajiraje chhatrapati gave a solid answer regarding afzal khan aurangzebs grave
social share
google news

Sambhajiraje Chhatrapati Mumbai Tak Chavadi: मुंबई: छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) वध केलेल्या अफजल खानाची (Afzal Khan) कबर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये असणारी औरंगजेबाची (Aurangzeb) कबर यावरून महाराष्ट्रात बऱ्याचदा राजकारण रंगल्याचं पाहायला मिळालं आहे. मात्र, याच गोष्टीबाबत छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांचे पणतू संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी अत्यंत रोखठोक असं आपलं मत मांडत त्यांची भूमिका स्पष्ट केली. मुंबई Tak च्या चावडीवर (Mumbai Tak Chavadi) आलेल्या संभाजीराजेंनी अनेक प्रश्नांची अत्यंत समर्पक अशी उत्तरं दिलं. मात्र, याचवेळी अफजल खान आणि औरंगजेबाच्या कबरीवरून जे राजकारणं रंगत त्याबाबत अत्यंत चोख असं उत्तर दिलं. (mumbai tak chavadi sambhajiraje chhatrapati gave a solid answer regarding afzal khan aurangzebs grave)

अफजल खान किंवा औरंगजेबाची कबर इथे असणं काही चुकीचं नाही.. पण त्याचं उदात्तीकरण करत त्याला धार्मिक स्वरूप कोणी देऊ नये. असं स्पष्ट मत संभाजीराजेंनी यावेळी व्यक्त केलं. पाहा संभाजीराजेंनी चावडीवर नेमकं काय उत्तर दिलं.

हे ही वाचा>> दारू आणि मांस… भाजप आमदार राम कदमांची मोठी मागणी, एकनाथ शिंदे काय करणार?

प्रश्न: अफजल खान, औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात नसली पाहिजे असं हिंदुत्ववादी म्हणतात, त्या वादाकडे तुम्ही कसं पाहता…

संभाजीराजे छत्रपती: आता इतिहासकार खऱ्या अर्थाने सांगू शकतील. मी काही इतिहासकार नाही.. जो इतिहास लिहलाय तो आपण वाचतो.. किंवा कोट केलं जातं.. की, ‘शिवाजी महाराजांनी तिथे अफजलखानाची कबर असावी.’

अनेक इतिहासकारांचं असं म्हणणं आहे की, असं कोट केलंय शिवाजी महाराजांनी.. अनेक इतिहासकारांचं म्हणणं आहे की, तसं शिवाजी महाराजांनी सांगितलं सुद्धा नाही.

पण समजा आपण धरू, की तिथे कबर होती.. कबर करायला लावली. पण याचा अर्थ असा नाही की तिथे तुम्ही मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करायचं.. त्याचं एवढं मोठं धार्मिक स्वरुप करायचं. की, अफजल खान फार काही तरी मोठा होता..

शिवाजी महाराज हे काही एखाद्या जातीविरोधात नव्हते. तर ते परप्रांतियांविरोधात होते. हा परप्रांतीय होता म्हणून त्या विरोधात.. मुस्लिम समाजाच्या विरोधात शिवाजी महाराज नव्हते. त्याचप्रमाणे औरंगजेब इथे मेला असेल तर शिवाजी महाराज असे कधीच म्हटले नसते की, इथे त्याची कबर ठेवू नका.. ठीक आहे.. इथे मेलाय तर कबर करा.. पण याचा अर्थ असा नाही की, ते धार्मिक स्थळ करा.. त्याला जाऊन काय वेगळी रांग लावा.. फुलं वाहत बसा.. हे असं कोणालाच चालणार नाही ना..

ठीकए तो परप्रांतिय आहे.. त्या धर्मातला.. मुस्लिम समाजातील असेल. तो तिथे मेला असेल तर त्याची कबर तिथे होऊ द्या ना.. त्यात काही अडचण नाही..

अडचण कधी होते ना.. तुम्ही त्याचं जेव्हा दैविक स्वरूप करून टाकलं तर.. धार्मिक स्वरूप करून टाकलं तर ते चुकीचं आहे.. असं स्पष्ट मत संभाजीराजे यांनी यावेळी व्यक्त केलं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT