'50 वर्ष लोकांनी तुमच्यावर..', RSS च्या पथसंचलनावर अशोक चव्हाणांनी फुलं उधळताच चिखलीकरांचा टोला

मुंबई तक

Prataprao Chikhalikar on Ashok Chavan : '50 वर्ष लोकांनी तुमच्यावर..', RSS च्या पथसंचलनावर अशोक चव्हाणांनी फुलं उधळताच चिखलीकरांचा टोला

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

RSS च्या पथसंचलनावर अशोक चव्हाणांनी फुलं उधळली

point

प्रताप चिखलीकरांची अशोक चव्हाणांवर जोरदार टीका

Prataprao Chikhalikar on Ashok Chavan, नांदेड : भाजपचे राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांनी दसऱ्यादिवशी आरएसएसच्या पथसंचलनावर फुलं उधळली. संपूर्ण आयुष्य काँग्रेसमध्ये घालवलेल्या अशोक चव्हाणांची RSS च्या  पथसंचलनावर फुलं उधळण्याची ही पहिलीच वेळ होती. विशेष म्हणजे लोकांना हे दुर्मिळ दृश्य पाहायला मिळालं. मात्र, हे दृश्य पाहून अशोक चव्हाणांच्या मित्र पक्षातील नेत्यानेच त्यांना टोला लगावलाय. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रतापराव चिखलीकर यांनी अशोक चव्हाणांवर टीका करण्याची संधी सोडली नाही. प्रतापराव चिखलीकर नेमकं काय म्हणाले? जाणून घेऊयात... 

हेही वाचा : संत्री कशी खाता? अक्षय कुमारचा फडणवीसांना प्रश्न, रोहित पवार संतापले; म्हणाले, शेतकऱ्यांच्या जखमेवर...

तुम्हाला मात्र RSS च्या पथसंचलन फुले उधळावी लागत आहेत, चिखलीकरांचा टोला 

प्रतापराव चिखलीकर म्हणाले, 50 वर्ष लोकांनी तुमच्या वर फुले उधळली. तुम्हाला मात्र RSS च्या पथसंचलन फुले उधळावी लागत आहेत.  50 वर्ष तुमच्या जीवावर राज्य केलं आज ते कुठं आहे ते तुम्ही पाहा ?  लोक आमच्या स्वागतासाठी फुल घेऊन उभे राहतात. तुमची हालत काय झाली? ते पाहा. आता पुढे अशोक चव्हाण तुमच्याकडे मत मागायला येऊ शकत नाहीत. इथून पुढे तुम्ही राष्ट्रवादीला मत द्या. तुमची सगळी कामं करण्याची जबाबदारी माझी राहील, असा टोलाही चिखलीकरांनी लगावलाय. दरम्यान, प्रतापराव चिखलीकरांच्या या वक्तव्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी महायुती बिघाडी होण्याचे संकेत आहेत. 

अशोक चव्हाण भाजपात आले अन् चिखलीकर राष्ट्रवादीत गेले 

राष्ट्रवादीचे आमदार प्रतापराव चिखलीकर हे कधीकाळी अशोक चव्हाणांचे कट्टर विरोधक मानले जायचे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत प्रतापराव चिखलीकरांनी अशोक चव्हाणांचा पराभव केला होता. मात्र, 2024 च्या लोकसभेपूर्वी अशोक चव्हाणांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 2024 लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाणांनी भाजपचं काम देखील केलं. मात्र, या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला पराभूत व्हावं लागलं. त्यानंतर अशोक चव्हाणांना पक्षांतर्गत विरोधाला नेहमी सामोरं जावं लागलं आहे. अशोक चव्हाण भाजपमध्ये आल्यानंतर सूर्यकांता पाटील आणि प्रतापराव चिखलीकरांनी पक्ष बदललाय. मात्र, दोघांनीही अशोक चव्हाणांना उपरोधित टोला लगावण्याची संधी कधीच सोडली नाही. 

हे वाचलं का?

    follow whatsapp